शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर पित्याकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST

रेणापूर पोलिसांनी सांगितले, शहरातील पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर राहत असलेले एक कुटुंब दररोज भिक्षा मागून आपली उपजीविका भागवितात. ...

रेणापूर पोलिसांनी सांगितले, शहरातील पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर राहत असलेले एक कुटुंब दररोज भिक्षा मागून आपली उपजीविका भागवितात. कुटुंबातील सर्व जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता, आरोपी पिता हा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असे. याबद्दल आई व कुणालाही काहीही सांगू नकोस, अन्यथा तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन, अशी धमकी देत असे. त्यामुळे मुलीने कुणालाही सांगितले नाही.

काही दिवसापासून सदरील अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले, तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती पाच ते सहा महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आईने मुलीस विचारणा केली असता, पित्याने अत्याचार केल्याचे सांगून धमकी दिल्याचे म्हणाली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने गुरुवारी रात्री उशिरा रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने, बाललैंगिक अपराध संरक्षण कायद्यासह अन्य कलमान्वये पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी...

रेणापूर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच आरोपीस अटक केली. शुक्रवारी रेणापूर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. क्रांती निर्मळ, सपोउपनि. राजकुमार गुळभिले हे करीत आहेत.