लातुरात भररस्त्यात एकावर भयंकर हल्ला; हैवानासारखे अर्धवस्त्र होईपर्यंत मारत राहिले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 00:52 IST2025-03-12T00:47:43+5:302025-03-12T00:52:08+5:30
Latur Crime news: लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर एका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. तो तरुण बेशुद्ध होईपर्यंत हे टोळके त्याला मारहाणर करत होते.

लातुरात भररस्त्यात एकावर भयंकर हल्ला; हैवानासारखे अर्धवस्त्र होईपर्यंत मारत राहिले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
-राजकुमार जोंधळे, लातूर
एका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने कपडे फाडत अर्धवस्त्र होईलपर्यंत जबर मारहाण केली. ही घटना आंबाजोगाई रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर ही व्हायरल झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बारमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मारेकरी आणि हल्ल्यातील जखमी तरुण हे सर्वजण बसले होते.
दरम्यान, बारमध्ये त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली असावी. त्यातूनच वाद झाला. थोड्याच वेळात एका तरुणावर भर रस्त्यावरच सहा ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण रत्यावरच काही वेळ निपचित पडला होता.
गर्दी जमल्यानंतरही करत राहिले मारहाण
त्यानंतरही मारेकऱ्यांकडून त्याला मारहाण करणे सुरुच होते. ही घटना सुरु असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अनेकांनी त्याचे व्हिडीओ केले. घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मारेकरी तरुण पसार झाले होते.
दरम्यान, घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला तातडीने एका वाहनातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलीस पथकांनी चौघांना ताब्यात घेतले
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वेगवेळ्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी टोळीतील चार जणांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, उर्वरित मारेकऱ्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेतील सर्वजण एकाच गटातील
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांची संपर्क साधला असता, घटनेपूर्वीची माहिती समोर आली. मारेकरी आणि जखमी तरुण हे एका बारमध्ये मंगळवारी बसले होते. त्यांच्यामध्ये कुठल्यातरी कारणावरुन बाचाबाची झाली. यातूनची ही घटना घडली असून, याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील जखमी तरुण आणि मारहाण करणारे हे एकाच गटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.