उदगीर: बिदर-उदगीर-नांदेड महामार्गावर रविवारी रात्री एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. बामणी पाटीनजीक कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कार चालवणारा २४ वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून, नळगीर गावावर शोककळा पसरली आहे.
पाेलिसांनी सांगितले, नळगीर (ता. उदगीर) येथील दिनेश उमाकांत थोटे (वय २४) हा तरुण कामानिमित्त हैदराबाद येथे वास्तव्याला होता. रविवारी सुट्टी असल्याने तो आपल्या कारने हैदराबादहून उदगीरकडे येत होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बामणी पाटीनजीक पोहोचला असता, उदगीरकडून बिदरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकशी त्याच्या कारची जाेराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला अन् दिनेशचा जागीच मृत्यू झाला.
हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर...
दिनेश हा अत्यंत कष्टाळू तरुण होता. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्याला हैदराबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी लागली होती. नवीन नोकरी अन् करिअरच्या सुरुवातीलाच काळाने त्याच्यावर घाला घातला. रविवारी रात्री गावाकडे पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा असा अंत झाला.
रुग्णालयामध्ये नातेवाइकांची गर्दी...
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उदगीर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रात्री उशिरा रुग्णालयात नातेवाईक अन् नळगीर येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एका तरुण मुलाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने नळगीर परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
Web Summary : A 24-year-old man from Nalgeer died in a car-truck collision on the Bidar-Udgir highway. The accident occurred near Bamani Pati, leaving the community in mourning. The young man was on his way home from Hyderabad when the tragic incident happened.
Web Summary : बीदर-उदगीर राजमार्ग पर एक कार और ट्रक की टक्कर में नलगीर के 24 वर्षीय युवक की मौत हो गई। बामनी पाटी के पास हुई दुर्घटना से समुदाय में शोक है। युवक हैदराबाद से घर लौट रहा था तभी यह दुखद घटना घटी।