शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद उपाध्यक्षांना धक्काबुक्की

By admin | Updated: February 19, 2015 00:31 IST

‘गोकुळ’चे रणकंदन : सतेज पाटील-महाडिक संघर्ष पेटला; कणेरीवाडीतील दूध संस्था दुबार ठरावावरून अध्यक्ष, सचिवाला मारहाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ)च्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या सुंदराबाई चव्हाण दूध संस्था, कणेरीवाडी (ता. करवीर)च्या दुबार ठरावाच्या सुनावणीवेळी सदस्यांची पळवापळव केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांना मोरे गटाने धक्काबुक्की व शिवीगाळ केली. संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे व सचिव पांडुरंग खोत यांना बेदम मारहाण करीत गाडीत घालून उचलून नेल्याने सहायक निबंधक कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. मोरे व खोत यांना रायगड धाबा येथे सोडून दिल्यानंतर त्यांना सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणातून आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाने पुन्हा पेट घेतली आहे. सुंदराबाई चव्हाण दूध संस्थेवर सुरेश मोरे यांची सत्ता आहे. ‘गोकुळ’चा ठराव करताना ३ विरुद्ध ९ मतांनी सुरेश मोरे यांच्या नावावर केला होता, पण विरोधी शशिकांत खोत यांच्या गटाने संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे यांच्यासह आणखी दोन सदस्यांना आपल्याबरोबर करून दुसरा ठराव दाखल केला. दुबार ठरावाची आज सहायक निबंधक कार्यालय, ताराबाई पार्क येथे सुनावणी होती. सुरेश मोरे व त्यांचे समर्थक सकाळी दहा वाजल्यापासून निबंधक कार्यालय परिसरात हजर होते. सव्वाअकरा वाजता खोत अध्यक्ष अरुण मोरे व सचिव पांडुरंग खोत यांना आपल्या गाडीतून घेऊन आल्यानंतर मोरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीचे दरवाजे उघडून अरुण मोरे व पांडुरंग खोत यांना मारतच गेटच्या बाहेर नेले. शशिकांत खोत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यात आली. निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलीस दाखल झाले. महाडिक गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाल्याने निबंधक कार्यालयातील वातावरण दिवसभर तणावपूर्ण होते. जाधव यांच्या पत्नीकडून अर्वाच्च शिवीगाळखोत यांच्या गटाने हिंदुराव जाधव यांना गेले तीन दिवस उचलले आहे. शशिकांत खोत तिथे आल्यानंतर जाधव यांच्या पत्नी व मुलांनी ‘माझ्या नवऱ्याला कुठे नेऊन ठेवलाय, माझे बाबा तीन दिवस कुठे आहेत’ असा जाब विचारत सचिव खोत यांना शिवीगाळ केली. मोरे, खोत अतिदक्षता विभागातअरुण मोरे व पांडुरंग खोत यांना मारहाण करीत उचलल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ठेवले आहे.सुरेश मोरे यांच्यासह आठजणांवर दरोड्याचा गुन्हाशशिकांत खोत यांना अरुण मोरे गटाने धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री सुरेश मोरे यांच्यासह आठजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. संस्थेचे सचिव पांडुरंग कृष्णा खोत यांनी फिर्याद दिली आहे. संशयित सुरेश मोरे, सचिन मोरे, संदीप सुरेश मोरे, अमोल आनंदा मोरे, यशवंत शंकर मोरे, अनिल भरमा शेळके, विजय प्रकाश मोरे, वैभव प्रकाश मोरे (रा. सर्व कणेरीवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या संशयितांनी अडीच तोळ्यांची सोन्याची चेन, १ लाख ३५ हजार रुपये आणि कागदपत्रे लंपास केल्याचा आरोप खोत यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.असे घडले राजकारणमोरे गटाकडे सहा संचालक होते, त्यातील दोन संचालक फोडून विरोधकांनी ठराव आपल्या नावावर केला, पण मोरे गटाने ताकद लावल्याने हिंदुराव जाधव यांना खोत गटाने तीन दिवसांपूर्वी उचलले होते, तर एका संचालकाने कोणाच्याच बाजूने येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही गटाकडे ४-४ संचालक राहिले, अशा परिस्थितीत संस्था अध्यक्षांचे मत निर्णायक असते. या बळावर ठराव आपल्या बाजूला करून घेण्याचा प्रयत्न खोत गटाचा होता. रीतसर आम्ही बहुमताने ठराव दाखल केला होता, पण काही मंडळींनी चुकीच्या पद्धतीने ठराव दाखल करून निष्कारण वाद निर्माण केला. आमच्याकडे नऊपैकी सहा सदस्य आहेत.- सुरेश मोरे४घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती घडली याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मोबाईल उचलला नाही.