शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जकात, एलबीटी दोन्ही नको

By admin | Updated: June 13, 2014 01:55 IST

व्यापारी भूमिकेवर ठाम : सर्वसमावेशक अहवाल शासनास पाठवू : महापौर

कोल्हापूर : समाजस्वास्थ्य बिघडविणारी व कालबाह्य ठरलेली जकात व्यवस्थाही नको अन् उद्योग-व्यापार सोडून कारकूनकी करून ‘अधिकारीराज’ला चालना देणारी एलबीटी (स्थानिक संस्था कर)ही नको. व्हॅटवर एक टक्का वाढवा; यातून महापालिकेला हक्काचा निधी घ्या, अशी ठाम भूमिका आज, गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. महापालिकेला नियमित व शाश्वत अशा स्वत:च्या आर्थिक स्रोताची गरज असल्याचे मत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले; तर शासनाला सर्वसमावेशक अहवाल पाठवू, अशी ग्वाही महापौर सुनीता राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महापालिकांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून ‘एलबीटी’साठी पर्याय सुचविण्याचे आदेश मंगळवारी (दि. १०) दिले होते. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात शहरातील प्रमुख व्यापारी संघटनांशी महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी व्यापारी संघटनांसह आयुक्त व महापौर यांनी भूमिका स्पष्ट केली. उद्या, शुक्रवारी महापालिके चे म्हणणे महापौर राऊत मुख्यमंत्र्यांना कळविणार आहेत. सध्या मेट्रोचा जमाना आहे. जकात ही बैलगाडीसमान कालबाह्य यंत्रणा ठरली आहे. जकातीसाठी महापालिका ठेकेदार नेमते. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्यापाऱ्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देतात, याचा अनुभव पाठीशी आहे. जकातीमुळे तस्करीला चालना मिळून समाजस्वास्थ्यही बिघडते. भ्रष्टाचाराला चालना देणाऱ्या जकात व्यवस्थेच्या आम्ही विरोधात आहोत. एलबीटीचे रेकॉर्ड ठेवून आम्ही मेटाकुटीस आलो आहोत. एलबीटीमुळे शहरातील ७० टक्के व्यापार शहराबाहेर गेला आहे. गेली सलग चार वर्षे या परीक्षेत मुलीने पहिला गुणवत्ता क्रमांक मिळविला होता. दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी होताना गौरव अग्रवालने ही परंपरा खंडित केली आहे. युपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम व पॅटर्न बदलल्यानंतर झालेली ही पहिलीच परीक्षा होती व म्हणूनच उमेदवारांसाठी ती आव्हानात्मक होती. राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८०, आयएफएस ३२, आयपीएस १५०, केंद्रीय सेवा गट ‘अ’ ७१०, गट ‘ब’ १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे. सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. (प्रतिनिधी)