कळे व मरळी येथील युवकांनी राबविली नदीकाठी स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST2021-03-30T04:13:57+5:302021-03-30T04:13:57+5:30

कुंभी नदीवर असणाऱ्या कळे - सावर्डे बंधारा परिसरात सकाळी युवक पोहण्यासाठी जात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून कचरा, ...

Youths from Kale and Marli cleaned the river | कळे व मरळी येथील युवकांनी राबविली नदीकाठी स्वच्छता

कळे व मरळी येथील युवकांनी राबविली नदीकाठी स्वच्छता

कुंभी नदीवर असणाऱ्या कळे - सावर्डे बंधारा परिसरात सकाळी युवक पोहण्यासाठी जात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून कचरा, कागद, जुने कपडे, घरातील जुन्या मोडक्या वस्तू, मृत कोंबड्यांचे टाकाऊ अवयव आदी कचरा साचू लागल्याने पाणी प्रदूषण होऊन पाण्यात उतरताना अडचणी येत होत्या. याठिकाणी सकाळी पोहायला येणाऱ्या कळे व मरळी येथील युवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच नदीपात्रालगत वाढलेली झुडुपे तोडून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता केल्यानंतर हा परिसर सुंदर दिसू लागला आहे. यापुढे या परिसरात कचरा टाकणाऱ्यांना पकडून देऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

फोटो ओळ

कळे : कुंभी नदीकाठी कळे- सावर्डे बंधाऱ्याजवळ स्वच्छता मोहीम राबविताना कळे व मरळी येथील युवक.

Web Title: Youths from Kale and Marli cleaned the river