शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महाडिकांची युवा शक्ती माझ्याविरोधातच : बंद खोलीतील चर्चेत ‘पी. एन.’ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:06 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा आणि विधानसभेवेळी महाडिक यांची युवा आघाडी कोणाच्या पाठीशी असते? अशी विचारणा ...

ठळक मुद्दे महाडिकांची युवा शक्ती माझ्याविरोधातच : ‘पी. एन.’ यांचा आरोप कॉँग्रेस कमिटीत वातावरण तापले

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा आणि विधानसभेवेळी महाडिक यांची युवा आघाडी कोणाच्या पाठीशी असते? अशी विचारणा करीत कॉँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी गेल्या काही वर्षांतील संतापाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर वाट करून दिली.

आम्ही प्रामाणिकपणे काम करीत असताना ‘गोकुळ’च्या नोकरभरतीत विरोधकांच्या मुलांना का घेतले जाते? असा आरोप त्यांनी यावेळी केला. प्रकाश आवाडे यांनीही महाडिकविरोधी सूर आळवल्याने कॉँग्रेस कमिटीतील बंद खोलीतील वातावरण चांगलेच तापले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन्ही कॉँग्रेस नेत्यांचा समेट घडवून आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी कॉँग्रेस कमिटीत जाऊन कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी पाऊण तास बंद खोलीत चर्चा केली. यामध्ये पाटील यांनी राष्ट्रवादी व महाडिकविरोधी तक्रारींचा पाढाच वाचत मनातील खदखद जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.

पी. एन. पाटील म्हणाले, आम्ही कॉँग्रेस सोडून कधी वेगळा विचार केला नाही. सदाशिवराव मंडलिक, संभाजीराजे आणि धनंजय महाडिक यांना आघाडीचे उमेदवार म्हणून प्रत्येक वेळा मताधिक्य दिले; पण विधानसभेला राष्ट्रवादी कॉँग्रेस आमच्या उलटे काम करते, हा इतिहास आहे.

धनंजय महाडिक यांची युवाशक्तीही स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देते. युवा शक्ती कोणाचे काम करते? ‘गोकुळ’च्या नोकरभरतीत विरोधकांच्या मुलांना कोणी घेतले? असा सवाल करीत, आम्हाला कॉँग्रेस पक्षाचा आदेश आलेला आहे, त्यास अधीन राहून आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार प्रामाणिकपणे करणार आहोत; पण कार्यकर्ते कितपत ऐकतील हे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी सांगून टाकले.प्रकाश आवाडे यांनीही पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. गेल्यावेळीही लोकसभेला महाडिक यांना मदत करण्यात आली. मात्र नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता परत कार्यक र्त्यांसमोर काय सांगायला जायचे, असा सवाल आवाडे यांनी उपस्थित केला.

यावेळी महाडिक यांनी यापुढे अशा चुका होणार नसल्याचे सांगितल्याचे समजते. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, धनंजय महाडिक, ए. वाय. पाटील, प्रकाश सातपुते उपस्थित होते.आताही २४ तारखेला आमच्याविरोधात सभा घ्यागेल्या लोकसभा निवडणुकीत आपली प्रकृती बरी नसतानाही ताकदीने काम करून ३५ हजारांचे मताधिक्य दिले आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी परिते येथे सभा घेऊन शिवसेनेच्या आमदाराच्या कामाचे कौतुक करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आताही लोकसभेचे मतदान २३ एप्रिलला संपते. लगेच दुसऱ्या दिवशी आमच्याविरोधात सभा घ्या, असा संताप पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.प्रचार न करण्यास आता जयंतराव, तुम्ही सांगा!विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी आपला प्रचार केला नसल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावर, अरुण गुजराथी यांनी प्रचाराला जाऊ नका, असा निरोप दिल्याचे महाडिक यांनी सांगितले. ‘त्यावेळी गुजराथी यांनी सांगितले, आता जयंतराव, तुम्ही सांगा!’ असा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर