Kolhapur: रांगोळीत धारदार शस्त्राने युवकावर वार; काही अंतरावरच घर, ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:39 IST2026-01-30T13:38:58+5:302026-01-30T13:39:55+5:30

खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

Youth murdered with sharp weapon in Rangoli kolhapur | Kolhapur: रांगोळीत धारदार शस्त्राने युवकावर वार; काही अंतरावरच घर, ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र..

Kolhapur: रांगोळीत धारदार शस्त्राने युवकावर वार; काही अंतरावरच घर, ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र..

इचलकरंजी : रांगोळी (ता.हातकणंगले) येथील काळमवाडी वसाहत येथे गुरुवारी रात्री युवकाचा चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शुभम कुमार सादळे (वय २८, रा. काळमवाडी वसाहत, रांगोळी) असे मृताचे नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. दोन ते तीन हल्लेखोर असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांतून वर्तविण्यात आली परंतु खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुभमचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काळमवाडी वसाहत येथील स्मशानभूमी परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत शुभमवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यातूनही त्याने काही अंतरावर असणाऱ्या घरी ओरडत पळत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वर्मी घाव बसल्याने तो वाटेतच खाली कोसळला. तेथून त्याला काहींनी उपचारासाठी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात नेले परंतु पोटात वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खून झाल्याची माहिती समजतात शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळावर पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. दोन ते तीन हल्लेखोर असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत समजले असून त्यांचा शोध घेण्याचे आणि खुनाचे नेमके कारण शोधण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title : कोल्हापुर: रांगोली में धारदार हथियार से युवक की हत्या।

Web Summary : रांगोली, कोल्हापुर में, 28 वर्षीय शुभम सादले पर घर के पास धारदार हथियार से जानलेवा हमला किया गया। उसने भागने की कोशिश की लेकिन चोटों के कारण दम तोड़ दिया। पुलिस हत्या की जांच कर रही है, कई हमलावरों पर संदेह है और मकसद की तलाश कर रही है।

Web Title : Kolhapur: Young man murdered with sharp weapon in Rangoli.

Web Summary : In Rangoli, Kolhapur, 28-year-old Shubham Sadale was fatally attacked with a sharp weapon near his home. He attempted to flee but succumbed to his injuries. Police are investigating the murder, suspecting multiple attackers and seeking the motive.