Kolhapur: नवे पारगावात तरुणाचा खून ?; शवविच्छेदनातून समोर आले नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:32 IST2024-10-01T16:31:51+5:302024-10-01T16:32:31+5:30

दिलीप चरणे नवे पारगाव : वाठार - वारणानगर राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वाडकर खोरीत नितीन मानसिंग ...

Youth killed in Nave Pargaon Kolhapur, reason unclear | Kolhapur: नवे पारगावात तरुणाचा खून ?; शवविच्छेदनातून समोर आले नेमकं कारण

Kolhapur: नवे पारगावात तरुणाचा खून ?; शवविच्छेदनातून समोर आले नेमकं कारण

दिलीप चरणे

नवे पारगाव : वाठार - वारणानगर राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वाडकर खोरीत नितीन मानसिंग भोसले (वय ३०. मूळ गाव मोहरे ता. पन्हाळा. सध्या रा. वारणानगर) याचा आज सकाळी मोटरसायकलसह मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, शवविच्छेदनातून नेमकं कारण स्पष्ट झाले.

नितीन भोसले याचा मृतदेह आढळून आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी तपासास सुरुवात केली. तपासादरम्यान काही इसमांना ताब्यात देखील घेतले.  दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनात नितीन याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे अंग भाजल्याचे तसेच फुफ्फुस जळाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. 

नितीन यांचे शिक्षण बी.ई. इलेक्ट्रीकल झाले होते. वारणा दूध संघाच्या जवळ वॅपकॉस येथे नोकरीस होता. सध्या तो वारणानगर येथे आई वडीलांसह राहत होता.  गेल्या दोन वर्षीपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्याला ४ महिन्याचा मुलगा आहे. 

Web Title: Youth killed in Nave Pargaon Kolhapur, reason unclear