Kolhapur: पाटगाव धरणात गाडी घसरून तरुण ठार, स्टंटबाजीने जीव गेल्याची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:48 IST2026-04-01T18:47:47+5:302026-04-01T18:48:09+5:30

गाळामुळे कार घसरल्याने चालकाचा ताबा सुटला

Youth dies after car falls into Patgaon Dam in Kolhapur district | Kolhapur: पाटगाव धरणात गाडी घसरून तरुण ठार, स्टंटबाजीने जीव गेल्याची चर्चा 

संग्रहित छाया

गारगोटी: पाटगाव (ता. भुदरगड) येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांची चारचाकी गाडी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. जैरुद्दीन शमशुद्दीन फकीर (वय २८, रा. म्हासरंग पैकी अनफ, ता. भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ अब्बास शमशुद्दीन फकीर यांनी भुदरगड पोलिसांत वर्दी दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अनफ येथील तरुण मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास करडवाडी (ता. भुदरगड) येथे क्रिकेट स्पर्धेत सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत जैरुद्दीन फकीर देखील क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान त्यांची मॅच नसल्याने त्यांनी भटवाडी येथील पाटगाव धरणाच्या बॅकवॉटरला जाण्याचा बेत आखला. जैरुद्दीन हा मित्रांसह पाटगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेला. यावेळी इम्तियाज खेडेकर हा चारचाकी चालवत होता.

दरम्यान गाळामुळे गाडी घसरल्याने गाडीचा ताबा सुटून ती धरणाच्या बॅकवॉटरमध्ये घसरली. या घटनेत जैरुद्दीन फकीर हा गाडीत अडकला. त्याला गाडी पाण्यात शिरल्यावर गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. तो गाडीतच अडकून पडला.

इतर मित्र गाडीतून बाहेर पडले. त्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र वेळ झाल्याने गुदमरून तो बेशुद्ध झाला होता. त्याला उपचारासाठी कडगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

स्टंटबाजीने जीव घेतला ?

घटनास्थळी या तरुणाचा जीव हा स्टंटबाजी करताना गेला असल्याची चर्चा सुरू होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाटगाव धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुणांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून स्टंटबाजी करण्याची धोकादायक फॅशन वाढत आहे. या बेफिकीर कृत्यांमुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा जीवघेण्या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून धरण परिसरात कडक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

Web Title : पाटगाँव बांध दुर्घटना में युवक की मौत, स्टंट की अफवाहें

Web Summary : पाटगाँव बांध के बैकवॉटर में कार फिसलने से एक युवक की मौत हो गई। घटना गरगोटी, भुदरगढ़ तालुका के पास हुई। स्टंट की अफवाहें फैल रही हैं क्योंकि स्थानीय लोग पिछली दुर्घटनाओं के कारण क्षेत्र में सख्त पुलिसिंग की मांग कर रहे हैं।

Web Title : Youth Dies in Patgaon Dam Accident, Stunt Rumors Surface

Web Summary : A young man died after a car slipped into Patgaon Dam's backwaters. The incident occurred near Gargoti, Bhudargad Taluka. Stunt rumors circulate as locals demand stricter policing of the area due to previous accidents.