भवानी मंडपात युवकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:59+5:302021-02-09T04:27:59+5:30

कोल्हापूर : येथील भवानी मंडप परिसरात एका युवकास आठ ते दहाजणांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. जुना ...

Youth beaten to death in Bhavani mandapa | भवानी मंडपात युवकास बेदम मारहाण

भवानी मंडपात युवकास बेदम मारहाण

कोल्हापूर : येथील भवानी मंडप परिसरात एका युवकास आठ ते दहाजणांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी दुपारी काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी करून तक्रार नसल्याने सोडून दिले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भवानी मंडप परिसरात बसलेल्या एका युगुलास तेथील युवकाने हटवले. त्या रागापोटी युगुलाच्या संभाजीनगर परिसरातील काही समर्थकांनी दुचाकीवरून भवानी मंडप परिसरात येऊन त्या युवकास बेदम मारहाण केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ माजला. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली; पण तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: Youth beaten to death in Bhavani mandapa