शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: नशेच्या प्रतिबंधित इंजेक्शनची विक्री, युवकास अटक; ६७ बाटल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:50 IST

न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

इचलकरंजी : येथील आवाडे अपार्टमेंट परिसरात नशिले प्रतिबंधित इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या युवकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. साहील किरण पाटील (१९, रा. यड्राव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मेफेन्टरमाइन सल्फेट टर्मिनल आणि ओफेनच्या प्रतिबंधित नशिल्या इंजेक्शनच्या ६७ बाटल्या, रोख रक्कम, मोपेड गाडी असा एक लाख १२ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

वस्त्रनगरीत नशिल्या पदार्थांचा सुळसुळाट सुरू आहे. यापूर्वीही आवाडे अपार्टमेंट परिसरात नशिल्या इंजेक्शन विक्रेत्यावर कारवाई केली होती. गुरुवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास गोविंद अपार्टमेंट ते आवाडेनगर रोडवर साहील हा नशिले इंजेक्शन विक्रीसाठी आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. त्यानुसार तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
 
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता २० हजार ४६६ रुपयांच्या ३० मिलीच्या मेफेन्टरमाइन सल्फेट टर्मिनलच्या ५४ बाटल्या आणि ५ हजार ५२५ रुपयांच्या ३० मिलीच्या मेफेन्टरमाइन सल्फेट ओफेनच्या १३ बाटल्या अशा एकूण ६७ बाटल्या मिळून आल्या. त्याचबरोबर १४०० रुपयांची रोकड, १५ हजार रुपयांचा मोबाइल आणि ७० हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण एक लाख १२ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ चौगले यांनी फिर्याद दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Youth Arrested for Selling Banned Drug Injections; 67 Bottles Seized

Web Summary : Ichalkaranji: A youth was arrested for selling banned drug injections. Police seized 67 bottles of mephentermine sulfate and other materials worth ₹1,12,391. The accused, Sahil Patil, is in police custody. Police are investigating the illegal drug trade in the area.