अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:13 IST2025-06-28T15:13:12+5:302025-06-28T15:13:58+5:30

कोल्हापूर : नाट्य क्षेत्रात असलेल्या असहाय्य तरुणीचा गैरफायदा घेऊन, अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी ...

Young woman tortured by threatening to make pornographic video viral, young man arrested in Kolhapur | अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक

अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक

कोल्हापूर : नाट्य क्षेत्रात असलेल्या असहाय्य तरुणीचा गैरफायदा घेऊन, अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी अनुपम मनोहर दाभाडे (वय ३५, रा. प्लॉट क्रमांक ५३०, व्यंकटेश रेसिडेन्सी, इंगळेनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पीडित मुलीने याबाबत फिर्याद दाखल केली.

राजारामपुरी पोलिसांनी सांगितले की, आरोपी दाभाडे हा नाट्य क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. तिला भेटण्याच्या निमित्ताने इंगळेनगरातील घरी बोलावून घेत होता.

तिचा गैरफायदा घेऊन सप्टेंबर २०२४ ते १ जून, २०२५ या कालावधीत त्याने अत्याचार केला. घडलेला हा प्रकार कोणालाही सांगू नये, यासाठी दाभाडे याने अश्लील व्हिडीओ काढून वेळोवेळी धमकाविले. अखेर या त्रासाला कंटाळून त्या तरुणीने राजारामपुरीत फिर्याद दाखल केली.

Web Title: Young woman tortured by threatening to make pornographic video viral, young man arrested in Kolhapur