कोल्हापूरमधील भुयेवाडीत गव्याचा हल्ला;पोटात शिंग खुपसल्यान कोथळा बाहेर, तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 23:08 IST2021-12-11T22:54:42+5:302021-12-11T23:08:12+5:30

करवीर तालुक्यातील भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार झाला.

A young man has died after being attacked by a Gaur; The incident took place in Kolhapur | कोल्हापूरमधील भुयेवाडीत गव्याचा हल्ला;पोटात शिंग खुपसल्यान कोथळा बाहेर, तरुण जागीच ठार

कोल्हापूरमधील भुयेवाडीत गव्याचा हल्ला;पोटात शिंग खुपसल्यान कोथळा बाहेर, तरुण जागीच ठार

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार झाला. अन्य दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी पावणे  सातच्या सुमारास गावातील प्रल्हाद पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ गव्याने हा हल्ला केला. सौरभ संभाजी पाटील (वय २१) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गव्याने त्याच्या पोटात शिंग खुपसल्याने त्याचा कोथळा बाहेर पडला. प्रल्हाद पांडुरंग पाटील (वय ५५) व शुभम महादेव पाटील ( वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

 पंचगंगा नदीच्या काठावर शुक्रवारी दिवसभर गवा बसून होता. रात्री तो गवा शिवाजी पुलावरून शिंगणापुरकडे गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच धिप्पाड गवा शनिवारी सायंकाळी भुयेवाडी येथे प्रल्हाद पांडुरंग पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ आला. स्वतः प्रल्हाद पाटील त्यावेळी चुलवाणाजवळ होते. तिथे त्यांच्या जनावरांचा गोठा आहे.

गवा जनावरांना मारेल या भीतीने त्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना पहिल्यांदा गव्याने उचलून फेकले. तेव्हा गावांत बराच गोंधळ उडाला. कांही तरुण गव्याला हुसकावून घालवण्यासाठी पुढे सरसावले. त्यामुळे बिथरलेल्या गव्याने हल्ला केला आणि  त्यात दोन तरुण गंभीरित्या जखमी झाले. त्यातील सौरभ पाटील याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करून गवा सादळे-मादळे गावच्या डोंगराच्या दिशेने गेला..

Web Title: A young man has died after being attacked by a Gaur; The incident took place in Kolhapur