शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

होय, शासनाचा निर्णय बरोबरच!

By admin | Updated: April 10, 2015 00:35 IST

प्रतिक्रिया : मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाचे आदेश

सांगली : राज्यातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. सांगली शहरातील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया.महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असल्याने येथील चित्रपटगृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळणे गरजेचे आहे. सध्या हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड मराठी चित्रपट निर्माण होत आहेत. परंतु मल्टिप्लेक्समध्ये ते सकाळी प्रदर्शित होतात. परिणामी त्यांना प्रेक्षकांचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ निश्चितपणे मराठी दिग्दर्शक व निर्मात्यांना होईल.- अजिंक्य पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना सांगली. ५सध्या मराठी चित्रपट पाहिले तर ते कोणत्याच क्षेत्रात कमी असल्याचे जाणवत नाही. अनेक चांगले विषय नेमकेपणाने युवा दिग्दर्शक हाताळत आहेत. प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविले पाहिजेत, ही मराठीप्रेमींची जुनीच मागणी होती. त्याला आता शासनाने मूर्त रूप दिले आहे. परंतु आता खरी जबाबदारी ही प्रेक्षकांची आहे. त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायला हवेत.- नितीन शिंदे, माजी आमदार, मनसे नेते, सांगली.मराठी चित्रपटाची क्षितिजे विस्तारत चालली आहेत. आज एकापेक्षा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या मध्यमवर्गीयांनाही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची हौस असते. परंतु प्राईम टाईमला मराठी चित्रपट नसल्याने आतापर्यंत प्रेक्षकांची निराशा होत होती. ती शासन निर्णयामुळे दूर झाली आहे.- गणेश शिवकाळे, बॅँक कर्मचारी, प्रेक्षक सांगली. शासनाचा हा निर्णय मराठी चित्रपटांच्या हिताचा आहे. परंतु प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविल्यास त्याला मराठी प्रेक्षक कमी प्रमाणात येतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी चित्रपट कोणत्या वेळेत दाखवावेत, याबाबत मुंबईत बैठक होत असल्याने त्याविषयी आताच अधिक भाष्य करता येणार नाही.- सतीश चाफळकर, चित्रपटगृह चालक, सांगली.मराठी चित्रपट निर्माते आजकाल चित्रपट निर्मितीसाठी खर्चास मागेपुढे पाहात नाहीत. साहजिकच दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आतापर्यंत मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविले जात नव्हते. शासकीय निर्णयामुळे भविष्यकाळात ते दाखविले जातील. यामुळे मराठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांना प्रोत्साहन मिळेल.- हरी कुलकर्णी, व्यवस्थापक, स्वरूप चित्रमंदिर, सांगली.