शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा स्थलांतरित, परदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली

By admin | Updated: December 15, 2015 00:25 IST

कळंबा तलावाला प्रदूषणाची दृष्ट : गाळाची दुर्गंधी, बेसुमार वृक्षतोडीमुळे रया गेली...

कळंबा : अथांग साचलेल्या उथळ पाण्यात फ्लेमिंगोसह हजारो पाणपक्ष्यांचे थवे, घरट्यांमध्ये चिमुकल्या पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याशी साद घालत किनाऱ्यावर येऊन थडकणाऱ्या लाटा, कळंबा तलावाचे काही वर्षांपूर्वीचे हे चित्र. जैवविविधतेने नटलेल्या या चित्रावर सुशोभीकरणाच्या नावाखाली उठाव न झालेल्या गाळाच्या दुर्गंधीचा, बेसुमार वृक्षतोडीचा बोळा फिरला व ‘पक्षी गेले दूर देशी’ अशी स्थिती आज निर्माण झाली. कळंबा तलाव परिसर हा एकेकाळी पशू-पक्षी, वनस्पतीबाबत अतिशय समृद्ध होता. उत्तम हवामान, मुबलक पर्जन्य, भौगोलिक स्थान व चांगल्या जमिनीमुळे येथे नंदनवन होते. त्याकाळी गावकावळा, घुबड, सुतार, पिंगळे, घार, कबूतर, गावबगळा, कोकीळ, सुगरण, गिधाड यांसारखे स्थानिक पक्षी, फ्लेमिंगो, पेंटेड स्टार्क, स्पून बिल हे परदेशी पाहुणे, याशिवाय विविध जातींच्या बदकांचा विहार पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी होत होती. पाणलोट व सायलेंट झोनमध्ये उभ्या इमारती, पेट्रोल पंप, हॉटेल्सची बांधकामे, कात्यायनी डोंगर परिसरातील वृक्षतोडीने पाण्याचा नैसर्गिक स्रोत बंद होऊन प्रदूषणात वाढ झाली. पाण्यातील फॉस्फेट वाढल्याने तलावाकाठी जलपर्णी फोफावली.पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे धुण्यासाठी झाल्याने, गाळाचा उठाव न झाल्याने तलावातील जलचरांचे खाद्य कमी झाले. हे खाद्य कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या घटली. तलावाकाठचे विविध प्रजातींचे वृक्ष तोडल्याने हजारोंच्या संख्येने दिसणारे स्थलांतरित पक्षी नगण्य झाले.थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होत असे. अनेक दुर्मीळ पाणवनस्पतींचे या तलावात अस्तित्व होते. वाढत्या प्रदूषणाने, बेसुमार वृक्षतोडीने हा वारसा नष्ट झाला. सध्या जरी सुशोभीकरणाचे काम सुरू असले, तरी शंभर वर्षांपूर्वीची जैवविविधता निर्माण करण्यासाठी आता तेवढीच वर्षे द्यावी लागतील.++तलावाकाठी पूर्वी तब्बल २०० प्रकारच्या प्रजातींचे पक्षी आढळून येत होते. वाढत्या प्रदूषणाने, नागरी वस्त्यांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. तलाव संवर्धनाची जबाबदारी सामूहिकरीत्या स्वीकारल्यास येत्या काळात हे चित्र नक्की बदलेल.- श्रद्धानंद रणदिवे, पक्षी निरीक्षक