शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमधील क्ष-किरण विभाग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

रुग्णांना आर्थिक भुर्दंड : पाच वर्षांपासून उच्च दाबामुळे एक्स-रेच निघत नाहीत; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

अनिल पाटील -मुरगूड -मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभाग उच्च दाबामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. विजेचा दाब उच्च क्षमतेने येत असल्याने एक्स-रे निघतच नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मुरगूडमधील ग्रामीण रुग्णालय सन २००८ पासून नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. यावेळी जुन्या इमारतीमधील सर्व विभाग नवीन इमारतीमध्ये नेले; पण क्ष-किरण विभाग हा जुन्या इमारतीमध्येच ठेवला. नवीन इमारतीमध्ये एक्स-रे मशीनसाठी स्वतंत्र खोली असताना तो विभाग त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का केला नाही, याबाबत साशंकता आहे. रुग्णालयामध्ये शेकडो गावांतून हजारो रुग्ण येतात. त्यापैकी अनेकांना क्ष-किरण विभागाची गरज वारंवार पडते. रुग्णांची संख्या पाहून याठिकाणी खास क्ष-किरण तंत्रज्ञाची नेमणूक केली आहे.हे या ठिकाणी २४ तास उपलब्ध असतात; पण एक्स-रे मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ते काहीही करू शकत नाहीत. जुन्या इमारतीमध्ये सध्या एमएसईबीकडून थ्री फेज सप्लाय दिला जातो; पण या ठिकाणी विजेचा वापर नसल्याने आलेला सर्व वीजप्रवाह हा क्षमतेपेक्षा जास्त असतो. त्यामुळे या विभागामध्ये असलेले मशीन कामच करत नाही. याबाबत क्ष-किरण तंत्रज्ञ शिंदे यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार केली असून, सकाळी दहापासून सायंकाळी चारपर्यंत एक्स-रे मशीन बंदच ठेवावे लागते.दरम्यान, आलेल्या रुग्णांना एक्स-रेसाठी खासगी ठिकाणी आधार घ्यावा लागतो. ३० रुपयांमध्ये ग्रामीण रुग्णालयात मिळणारा एक्स-रे रुग्णांना २५० रुपये देऊन घ्यावा लागतो. याबाबत कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालय, आरोग्य विभाग यांच्याकडे २०१३ मध्ये पत्रव्यवहार करून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये जीव वैद्यकीय अभियंता विभागातून चार अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर या पथकाने नवीन इमारतीमधील एक्स-रे खोलीमध्ये काही त्रुटी सांगितल्या होत्या. त्यामध्ये खोलीची दुरुस्ती, असणाऱ्या भिंतीची जाडी, डार्क खोलीची डागडुजी आणि भाभा अ‍ॅटो, मुंबईचा परवाना या त्रुटींच्या पूर्ततेवर एक्स-रे विभाग स्थलांतराची परवानगी वरिष्ठ पातळीवरून दिली होती; पण याला सव्वा वर्ष होऊन गेले, तरी अद्याप या त्रुटींची पूर्तता न झाल्याने एक्स-रे विभाग बंद अवस्थेतच आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ. थोरात यांनी यामध्ये लक्ष घालून आठ दिवसांच्या आत जर हा विभाग नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केला नाही, तर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक परेश चौगले, रणजित सूर्यवंशी, बबन बारदेस्कर, किशोर पोतदार, आदींनी दिला आहे.दुर्लक्षामुळेच विभाग बंद क्ष-किरण विभागाबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, निवेदनाद्वारे आपण तक्रार केली होती; पण जाईल त्यावेळी अधीक्षकांनी करुया, प्रक्रिया सुरू आहे, काही दिवसांतच पूर्ण होईल, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली आहे. - रणजित सूर्यवंशी, सदस्य, सल्लागार समिती, ग्रामीण रुग्णालयवरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरूएक्स-रे मशीनची अवस्था उच्च दाबामुळे बिघडली आहे. याबाबत एमएसईबीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असून, नवीन जागेमध्ये हा विभाग नेण्यापूर्वी नवीन इमारतीमधून तात्पुरता वीजपुरवठा देऊन मशीन सुरू करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत.- डॉ. एस. बी. थोरात, वैद्यकीय अधीक्षक, मुरगूड ग्रामीण रुग्णालय