Navratri २०२५: अष्टमीला कोल्हापुरातील अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:50 IST2025-09-30T17:49:45+5:302025-09-30T17:50:53+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पारंपारिक पूजा बांधण्यात आली. महिषासुराशी आठ दिवस घनघोर ...

Navratri २०२५: अष्टमीला कोल्हापुरातील अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पारंपारिक पूजा बांधण्यात आली. महिषासुराशी आठ दिवस घनघोर युद्ध केल्यानंतर अष्टमीला दुर्गेने महिषासुराचा वध केला त्याचे प्रतिक म्हणून ही पूजा बांधली जाते.
मंगळवारी दुपारी बाराच्या आरती नंतर अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पारंपारिक पूजा बांधण्यात आली. रंभ नावाचा दैत्य भगवान शंकरांची उपासना करत होता. त्याने उपासना करून भगवान शंकरांना त्यांच्यासारखा पराक्रमी पुत्र द्या असे वरदान मागितले. त्याला अनुसरून भगवान शंकरांनी आपलाच एक अंश पुत्ररूपात प्रगट होईल असे वरदान दिले रंभाने तिथे असलेल्या महिशीमध्ये आपले तेज टाकले तेव्हा त्यातून उग्र असा महिषासुर प्रगट झाला. त्याने सर्व देवांचे सर्व अधिकार काढून घेतल्यानंतर पराजित झालेल्या देवांनी ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश आहेत अशा ठिकाणी जाण्याचे ठरवले. त्या वेळेला देवांवर झालेले अन्याय ऐकून भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शरीरातून तेज बाहेर पडले.
त्या तेजात सर्व देवांचे तेजही एकत्र झाले आणि तिथे सर्व दिशांची पोकळी व्यापणारी अशी एक तेजाची दुर्गा प्रकट झाली. आठ दिवस घनघोर युद्ध केल्यानंतर दुर्गेने अष्टमीला महिषासुराचा वध केला. म्हणून करवीर निवासिनीची दरवर्षी महाष्टमीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते.