आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक हिंदी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:39+5:302021-09-15T04:28:39+5:30

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत ...

World Hindi Day at Ambubai Patil English Medium School | आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक हिंदी दिन

आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक हिंदी दिन

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

प्राचार्य के. डी. पाटील यांच्याहस्ते सरदार पाटील यांचा "स्पीड न्यूज लाईव्ह चैनल २४ यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार" मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत हिंदी स्वागत गीत, देशभक्तीपर हिंदी कविता, हिंदी नाटिका सादर केल्या. यावेळी शिक्षकांनी हिंदी दिनाचे महत्त्व पटवून सांगणारे भाषण केले. यावेळी हिंदी विभागप्रमुख मुख्याध्यापिका शकुंतला पाटील, शिक्षिका मनीषा पाटील, नीता संकपाळ, जी. बी. पाटील, नितीन पाटील, आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार शिक्षिका सीमा पाटील यांनी मानले.

Web Title: World Hindi Day at Ambubai Patil English Medium School