शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तहसीलवर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: January 21, 2015 23:50 IST

कारवाईची मागणी : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीचा निषेध

कऱ्हाड : रेशनिंग दुकानदार सामान्यांशी उद्धट वर्तन करतात. तसेच ग्राहकांना वेळेवर धान्यवाटप केले जात नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत असून, या उद्धटगिरी करणाऱ्या रेशनिंग धान्य दुकानदारांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील मंगळवार पेठेतील महिलांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. रेशनिंग दुकानदारांच्या मनमानीचा महिलांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना देण्यात आले. लोकशासन आंदोलनाच्या माध्यमातून येथील मंगळवार पेठेतील शंभरहून अधिक महिलांनी मंगळवार पेठेतून तहसील कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. मोर्चावेळी लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील, अ‍ॅड. मनीषा रोटे, विजय क्षीरसागर, नितीन कचरे, सुमन कोळी, फरजाना कच्छी, जोहरा कच्छी, सीमा माने, सुनंदा उबाळे, जयश्री जाधव, कमल शेवाळे, अंजना देशमुख, विजया भोसले आदींसह मंगळवार पेठेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कऱ्हाड शहरातील रेशनिंगविक्री करणाऱ्या २८ शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य पुरवठ्याबाबत योग्य माहिती न देता तसेच धान्याचा बाजारभावही न सांगता फक्त तोंड बघून धान्यवाटप केले जाते. तसेच धान्य विक्रेत्यांकडून काळाबाजारही केला जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीरपणे धान्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी तहसीलदारांकडे केली.दुकानदारांनी गाळ्यासमोर वाटपाबाबत येणाऱ्या धान्याविषयी ग्राहकांना सविस्तर माहिती द्यावी, दुकानदारांनी महिलांशी सभ्यपणे वागावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)दुकानास टाळे ठोकणारउर्मटपणे वागणाऱ्या धान्य दुकानदारांवर शासनाने आठ दिवसांमध्ये कारवाई न केल्यास सर्व महिला या दुकानदारांच्या दुकानास टाळे ठोकतील. तसेच यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा मंगळवार पेठेतील महिलांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.