महिलेचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:22+5:302021-02-08T04:21:22+5:30

कोल्हापूर : येथील जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरनजीक अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसडा ...

The woman's Manimangalasutra was dragged away | महिलेचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून लांबविले

महिलेचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून लांबविले

कोल्हापूर : येथील जरगनगरमधील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरनजीक अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी घडली, त्याची रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेखा किसन पाटील (वय ३५, रा. त्रिमूर्ती कॉलनी, शांतिनगर, पाचगाव ता. करवीर) या शनिवारी सकाळी जरग विद्यामंदिरनजीक रेणुका मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून पायी जात होत्या, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेले. त्यावेळी त्यांनी आरडा-ओरडा केला, पण तोपर्यंत चोरट्याने आपला डाव साधून धूम ठोकली होती. त्यांनी शनिवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Web Title: The woman's Manimangalasutra was dragged away