बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची चेन लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:32 IST2021-03-27T16:30:26+5:302021-03-27T16:32:05+5:30
Crimenews Kolhapur- एसटी. बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा प्रकार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. चोरट्याने प्रवाशाची सुमारे १७ ग्रॅम वजनाची सोन्याची ५१ हजार रुपये किमतीची चेन लांबवली.

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची चेन लंपास
कोल्हापूर : एसटी. बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा प्रकार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. चोरट्याने प्रवाशाची सुमारे १७ ग्रॅम वजनाची सोन्याची ५१ हजार रुपये किमतीची चेन लांबवली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका वगे (रा. निलगंगा अपार्टमेंट, जि. प. जवळ, नागाळा पार्क) ह्या कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावरुन गणपतीपुळे येथे जाण्यासाठी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी.
बसमध्ये बसत होते. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली, याबाबत त्यांचे पती स्वप्नील बाळकृष्ण वगे यांनी शाहुपुरी पोलिसात चोरीची तक्रार दिली.