नांदणी येथे महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:56+5:302021-05-20T04:25:56+5:30

शिरोळ : पती व दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तणावातून महिलेने विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना नांदणी (ता. शिरोळ) येथे ...

Woman commits suicide at Nandani | नांदणी येथे महिलेची आत्महत्या

नांदणी येथे महिलेची आत्महत्या

शिरोळ : पती व दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तणावातून महिलेने विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना नांदणी (ता. शिरोळ) येथे बुधवारी उघडकीस आली. मालती राजेंद्र शिंगाडे (वय ४३), असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मालती यांचे पती राजेंद्र शिंगाडे, तसेच मुलगा व मुलगी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. हे तिघे जण कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पती व मुलांना कोरोनाची लागण झाल्याच्या तणावामध्ये त्या होत्या. त्यातूनच नांदणी येथील मौला शिकलगार यांच्या विहिरीमध्ये मालती शिंगाडे यांनी आत्महत्या केली. सकाळी आठच्या सुमारास आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची वर्दी विजय शिंगाडे यांनी पोलिसांत दिली असून, अधिक तपास सहायक फौजदार एम. एम. माने करीत आहेत.

-------------------------

तणावातून टोकाचे पाऊल

मुलगा दोन दिवसांपासून आयजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. त्यातच पती व मुलगी यांना गावातील शाळेत क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे मालती या तणावात होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

Web Title: Woman commits suicide at Nandani