भामटे येथे महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST2021-02-10T04:22:54+5:302021-02-10T04:22:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सोन्याचे गंठण घेतलेस का? असा जाब विचारल्यामुळे वाद वाढत गेला व एका महिलेस शिवीगाळ ...

Woman beaten at Vamte | भामटे येथे महिलेस मारहाण

भामटे येथे महिलेस मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सोन्याचे गंठण घेतलेस का? असा जाब विचारल्यामुळे वाद वाढत गेला व एका महिलेस शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी करवीर तालुक्यातील भामटे येथे घडली. छाया गणपती समुद्रे (४५, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात जान्हवी सर्जेराव कांबळे (रा. भामटे) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

मोपेड चोरी

कोल्हापूर : कसबा बावडा रोडवरील अन्नधान्य वितरण कार्यालयाशेजारील उभी केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची मोपेड अज्ञाताने बनावट चावीचा वापर करून चोरून नेली. याप्रकरणी मोपेडमालक काशिनाथ रामचंद्र पालकर (५६, रा. कणेरकरनगर, माजगावकर कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी दुचाकी चोरीची शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Woman beaten at Vamte