शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

मशागत, बियाणांनी शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, यांत्रिकीकरणाबरोबर ‘संकरित वाण’ आलं मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 1:10 PM

सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : यांत्रिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती अवजारे अडगळीत टाकली, पूर्वी घरोघरी असणारी ‘बीज बँक’ संकरितच्या नादाने काळाच्या ओघात बंद पडली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम शेतीवर झाला आहे. यांत्रिकीकरण व संकरित बियाणे हे आता शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. मशागतीबरोबर बियाणांच्या दरात झालेल्या वाढीने जमीन कसायची कशी, पेरायचे काय, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.पूर्वी घरोघरी बैल, नांगर पाहावयास मिळत होते. साधारणत: एप्रिलपासूनच खरिपासाठी शिवार तयार करण्याची लगबग पाहावयास मिळत होती. मात्र, काळाच्या ओघात हे सगळे चित्र पालटून गेले आहे. बैलांच्या औताची जागा ट्रॅक्टर, रोटाव्हेटरने घेतली. त्यामुळे घरोघरी दिसणारा बैल, नांगर बंद झाले. सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे. डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने मशागतीचे दर वाढले असून, एकरी ८०० ते १००० रुपयांनी दरात वाढ केली आहे.

पूर्वीच्या काळात घरोघरी ‘बीज बँक’ कार्यरत होती. आपणाला वर्षाला लागणारे बियाणे घरी सुरक्षित साठवून ठेवले जात होते. उत्पादकता वाढीसाठी संकरित बियाणांच्या मागे शेतकरी लागले आणि ही बँक कधी मोडून पडली हे त्यालाच कळले नाही. आपण संकरित वाणांच्या इतक्या आहारी गेलो की आपल्या जमिनीत कोणते वाण पेरायचे हे विक्रेतेच ठरवू लागले. सुरुवातीच्या टप्प्यात उत्पादनात मोठी वाढ झाली हे जरी खरे असले तरी आता हेच संकरित वाण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागले आहेत.कंपन्या लावेल त्या दराने बियाणे खरेदी करावे लागत आहे. महागडे बियाणे खरेदी करून ते शंभर टक्के उगवेलच असे नाही. भाताच्या विविध वाणांच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरातही किलोमागे ३० रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच यंदाच्या खरीप हंगामात मशागत, बियाणे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार, हे मात्र निश्चित आहे.

असे आहेत रोटरने नांगरटीचे दर

कामदर प्रती गुंठा
नांगरट१३०
नांगरट करून सरी काढणे२५०
सरी फोडून उसाची भरणी१५०

 

जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हेक्टरमध्ये

पीक क्षेत्र
भात९९ हजार ५००
भुईमूग५१ हजार
सोयाबीन५० हजार
नागली२२ हजार
ज्वारी, बाजरी२५ हजार
ऊस१ लाख ७३ हजार

डिझेलच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने मशागतीच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्हीही शेतकरीच आहोत. मात्र, आज बाजारात कोणत्या वस्तूच्या दरात वाढ झालेली नाही, हे सांगा. - गणेश माळी (ट्रॅक्टर चालक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीInflationमहागाई