शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सरस काम करू : महाडिक

By admin | Updated: September 10, 2014 23:52 IST

मुरगूडमध्ये नागरी सत्कार : केंद्रातील विविध योजना राबविण्याचा विश्वास

मुरगूड : गेल्या पन्नास वर्षांचा अनुशेष तीन महिन्यांमध्ये आपण भरून काढला असून, संसदेमध्ये जिल्ह्यातील विविध समस्या कणखरपणे मांडल्या आहेत. पंचगंगा प्रदूषण, रंकाळा प्रदूषण, जिल्हा पर्यटन, गडकिल्ले सुशोभीकरण, विमानतळ, रेल्वे स्थानक, पासपोर्ट कार्यालय, आदी रेंगाळलेल्या समस्यांना प्राधान्य देऊन सुजलाम् सुफलाम् जिल्हा बनविण्याचा प्रयत्न करणार असून, आतापर्यंत झालेल्या सर्व खासदारांपेक्षा सरस काम करून दाखवू, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी येथे व्यक्त केला. मुरगूड (ता. कागल) येथे नगरपरिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. यावेळी लाल आखाडा, सस्पेन्स मित्रमंडळ, मराठा गु्रप, यूथ सर्कल या तरुण मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. महाडिक म्हणाले, दहा वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीतही मुरगूड शहराने मला मोलाची साथ दिली होती. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना भल्याभल्या दिग्गजांचा पराभव झाल्यानंतरही कोल्हापूरच्या जनतेने विचार करूनच मते दिल्याने आपला विजय झाला. तीन महिन्यांमध्ये आपण केंद्रीय मंत्र्यांना भेटून कोल्हापूरच्या समस्यांबाबत आपले मत मांडले असून, सभागृहामध्येही आवाज उठविला आहे. सिमेंट दर, कर्जमाफी, महिला अत्याचार, आदींबाबत सखोल अभ्यास करून सभागृहात रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यात केंद्राच्या विविध योजना मुरगूडमध्ये आणण्याचे आश्वासन देऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे उभे राहण्याची विनंतीही त्यांनी केली.प्रवीणसिंह पाटील म्हणाले, महाडिक आणि मुरगूडकर पाटील हे समीकरण अनेक वर्षांपासूनचे आहे. महाडिक जेथे असतील, तेथेच पाटील असतील. महादेवराव महाडिक यांनी वेळोवेळी नगरपालिकेसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. तीच परंपरा धनंजय महाडिकही सुरू ठेवतील. उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अजितसिंह पाटील, सखाराम डेलेकर, मुरगूड बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, राजू आमते, दत्तामामा जाधव, नगरसेवक परेश चौगले, रणजित सूर्यवंशी, विजय मेंडके, आदी उपस्थित होते. शंकर शेणवी यांनी आभार मानले.