शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा शवविच्छेदनाचा अहवाल न मिळाल्याने पत्नीचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

: वारंवार मागणी करूनही गेल्या एक वर्षापासून मृत पतीच्या शवविच्छेदनाचा अहवाल देण्यास मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने ...

: वारंवार मागणी करूनही गेल्या एक वर्षापासून मृत पतीच्या शवविच्छेदनाचा अहवाल देण्यास मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केल्याने गोगवे (ता. शाहूवाडी) येथील रूपाली रंगराव गुरव यांनी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

रूपाली यांचे पती रंगराव सदाशिव गुरव यांचा ३० एप्रिल २०२० रोजी शेतामध्ये काम करत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता. यावेळी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे नेमके कारण समजू न शकल्याने त्यांचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान रंगराव गुरव यांच्या विमा पॉलिसीसह इतर शासकीय कामासाठी रूपाली गुरव यांना शवविच्छेदनाच्या अहवालाची आवश्यकता असल्याने त्यांनी या अहवालाची मागणी शाहूवाडी पोलीस ठाणे तसेच मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाकडे केली. परंतु दोन्हीकडील प्रशासनाने हा अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना अद्यापही हा अहवाल मिळू शकलेला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात हा अहवाल न मिळाल्यास आपल्या कुटुंबीयांसमवेत २२ एप्रिलपासून शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रूपाली गुरव यांनी दिला आहे.