शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराचा खर्च कोण भागविणार

By admin | Updated: February 26, 2015 00:46 IST

सरकारची भूमिका संदिग्ध : कुटुंबीयांच्या मदतीसाठी लोक स्वत:हून पुढे

विश्वास पाटील - कोल्हापूर --ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर येथील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात झालेल्या उपचाराचा खर्च कोण भागविणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राज्य शासनाने एअर अ‍ॅम्बुलन्ससह मुंबईतील खर्चाची जबाबदारी घेतली आहे परंतु येथील खर्चाबाबत सरकारने काहीच स्पष्ट केलेले नाही. सरकार काही करू दे अथवा नाही, काही झाले तरी उपचाराच्या खर्चातील एक रुपयाही पानसरे कुटुंबीयांना भरायला लागू नये यासाठी स्वत:हूनच लोक पुढे येत आहेत.पानसरे दाम्पत्यावर १६ फेब्रुवारीस दारातच गोळीबार झाल्यावर त्यांना तातडीने अ‍ॅस्टर आधारमध्ये दाखल करण्यात आले. गोविंद पानसरे यांच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांना २० फेब्रुवारीस मुंबईला ब्रीच कँडी रुग्णालयात हलविले. त्या दिवशी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. उमा पानसरे यांच्यावर मात्र अजूनही अ‍ॅस्टर आधारमध्येच उपचार सुरू असून आणखी किमान पंधरा दिवस त्यांना रुग्णालयात ठेवावे लागण्याची शक्यता आहे. पानसरे यांच्यावरील उपचाराचा ४ लाख ६० हजार खर्च झाला आहे. उमाताई यांच्यावरील उपचाराचा खर्च दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकत्रित सहा लाखांवर खर्च अपेक्षित आहे. पानसरे यांच्यावरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते परंतु तो मुंबईतील की कोल्हापुरातील हे स्पष्ट झालेले नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या खूनप्रकरणी राज्यातील भाजप सरकारवर व मुख्यमंत्र्यांवरही कम्युनिस्ट पक्षासह सर्वच डाव्या पुरोगामी पक्षांकडून व नेत्यांकडून टीका झाली आहे. त्यामुळे सरकारची मदत घेण्याबाबतही संदिग्धताच आहे.मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी पानसरे यांना बघायला गेल्यावरच स्वत:हून एक लाखाचा धनादेश दिला आहे. आणखी काही मदत लागल्यास कळवा, धनादेश पाठवून देतो, असे त्यांनी सांगितले आहे. पानसरे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ््याची मैत्री असलेल्या पाच-सहा वकील मित्रांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ के. ए. कापसे यांनी खर्चाची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, असे सांगितले आहे. त्याशिवाय पानसरे यांच्याशी गेल्या पंचवीसहून अधिक वर्षाचा स्नेह असलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अभय नेवगी यांनीही रुग्णालयाचे बिल किती झाले तेवढे सांगा, त्याचा धनादेश पाठवून देतो, असे सांगितले आहे. माणुसकीचा ‘आधार’अ‍ॅस्टर आधार रुग्णालयातील डॉक्टरांशी पानसरे यांचे अगोदरपासूनच ऋणानुबंध होते. पानसरे कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे बिलाबाबत प्राथमिक चौकशी केली. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, उमातार्इंवर चांगले उपचार होऊन त्या घरी जाऊ देत मग बिलाचे काय करायचे ते ठरवू, असे रुग्णालयाने त्यांना सांगितले आहे. त्यामुळे रुग्णालयही माणुसकीचा काही तरी ‘आधार’ देण्याच्या विचारात आहे.सरकारचा रुपयाही नको...पानसरेंवर हल्ला झाल्याप्रकरणी राज्य सरकारची भूमिका वादग्रस्त राहिली आहे. हा हल्ला हिंदुत्ववादी संघटनांकडून झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. राज्यात भाजपचे सरकार असून, त्यांचे हिंदुत्ववाद्यांना पाठबळ असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पानसरे यांच्यावरील उपचारांचे बिल भागविण्यासाठी सरकारकडून एक रुपयाही घ्यायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.पानसरे कुटुंबीय आज ‘आयजीं’ना भेटणारकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाबाबत गेल्या नऊ दिवसांत पोलिसांना कोणतीही माहिती हाती लागलेली नाहीच; शिवाय पोलीसच हल्ल्याच्या कारणांबाबत लोकांत संभ्रम निर्माण होईल, अशी माहिती माध्यमांना देत असल्याबाबत पानसरे कुटुंबीय आज, गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांची भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होणार आहे. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी उदय नारकर होते. पुढील कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ही बैठक झाली झाली. त्यास दिलीप पोवार, नामदेव गावडे, मिलिंद यादव, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते. गोविंद पानसरेभ्याड हत्या प्रकरण