शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५७ कोटींचा बनावट धनादेश, माहिती देणारे कोण?; पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:02 IST

मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बनावट धनादेशांचा वापर करून ५७ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटमधील एका संशयिताच्या अटकेनंतर शाहूपुरी पोलिस या गुन्ह्याच्या सूत्रधाराच्या शोधात आहेत. बनावट बँक खाती काढून बनावट धनादेशाद्वारे रक्कम हडपणारे पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. पण, त्यांना जिल्हा परिषदेच्या धनादेशांची माहिती देणारे आणि मोठ्या रकमेचा धनादेश पास करणारे बँकेतील कर्मचारी अजूनही मोकाट आहेत. ते संशयितही लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.विविध प्रकारची आमिषे दाखवून किंवा डिजिटल अटकेची भीती घालून ऑनलाइन गंडा घातल्याचे अनेक प्रकार आजवर घडले आहेत. मात्र, अशा गुन्ह्यांचे तपास फार पुढे गेलेले नाहीत. शहरातील एका उद्योजकास डिजिटल अटक करून त्याच्याकडून कोटीची रक्कम उकळण्याचा प्रकार घडला होता. त्या गुन्ह्यात उद्योजकाची काही रक्कम गोठवून ती परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. परंतु, आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. बनावट धनादेशाद्वारे ५७ कोटींची रक्कम हडप करण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यात सर्व रक्कम सुरक्षित ठेवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर बनावट कंपन्यांच्या नावे बँक खाती उघडणारे आणि बनावट धनादेश बँकेत भरणाऱ्या संशयितांपर्यंत पोलिस पोहोचले. यातील कपिल चौधरी याला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून फसवणूक करणाऱ्या टोळीतील काही एजंट आणि म्होरक्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.आता स्थानिक संशयितांचा शोधउत्तर प्रदेशातील भामट्यांना जिल्हा परिषदेच्या धनादेशाची माहिती कशी मिळाली? धनादेशाचा नंबर, त्यावरील सह्यांचे नमुने देणारे स्थानिक संशयित कोण आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले. पाच लाखांवरील धनादेश असल्यास तो संबंधित कार्यालयाकडे चौकशी केल्याशिवाय बँकेकडून पास केला जात नाही. मग जिल्हा परिषदेचा मोठ्या रकमेचा धनादेश कसा पास झाला? यात बँकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे काय? याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. गाझियाबादमधील टोळीचा म्होरक्या हाताला लागताच त्याला मदत करणाऱ्या स्थानिक संशयितांचीही माहिती मिळेल, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

पोलिसांची दिल्लीपर्यंत धावआर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बँक खाते काढणारे वेगळे असतात. फसवणुकीसाठी त्यांचा वापर करणारे दुसरे आणि पैसे काढून घेणारे तिसरेच असतात. हे सर्व संशयित देशात वेगवेगळ्या राज्यात बसून काम करतात. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास वेळखाऊ आणि आव्हानात्मक असतो. शाहूपुरी पोलिसांनी दिल्लीपर्यंत धाव घेऊन याचा तपास केल्याने प्रथमच अशा गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यश आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस