शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापूरची व्हाईट आर्मी धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 13:18 IST

Flood Chiplun Kolhapur : महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील व्हाईट आर्मी धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे. देशात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या व्हाईट आर्मी च्या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देतीन गावांतील लोक, रुग्णांना स्थलांतरित केले बारा जणांच्या पथकाची कामगिरी : पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर : महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील व्हाईट आर्मी धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे. देशात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या व्हाईट आर्मी च्या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला महापूर आला. त्यामुळे चिपळूण शहर आणि परिसर पाण्याखाली गेला. हे समजताच दि. २२ जुलै रोजी त्याठिकाणी मदतकार्यासाठी कोल्हापूरमधून व्हाईट आर्मीचे बारा जणांचे पथक अत्यावश्यक वस्तू घेऊन दोन बोटींसह रवाना झाले. चिपळूण स्टँडजवळील हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांना आयसीयु कक्षातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. गरोदर महिलांनाही सुखरूपपणे स्थलांतरित केले.चिपळूणमध्ये मदतकार्य करणाऱ्या ह्यव्हाईट आर्मीह्णच्या पथकात सुधीर गोरे (टीम लीडर), नीलेश वणकोरे, प्रदीप ऐनापुरे, विनायक भाट, राजेश्वरी रोकडे, सुमित साबळे, नीलेश तवंदकर, नितीन लोहार, सत्यजित साळोखे, आकाश पाटील यांचा समावेश होता.

आपत्ती व्यवस्थापनमध्ये गेल्या २० वर्षांपासून व्हाईट आर्मी कार्यरत आहे. कोल्हापूर, सांगली, उत्तराखंड येथील महापूर, केरळमधील त्सुनामी... आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा राबविली आहे. माणुसकीच्या नात्याने मदतकार्य केले जाते. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच यावर्षी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हाईट आर्मीच्या टीमने तेथे जाऊन मदतकार्य केले. सुमारे चारशे पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.- अशोक रोकडे, संस्थापक, व्हाईट आर्मी.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी