शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:29 IST

महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.

ठळक मुद्देमायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाकपिके काढायची की तशीच ठेवायची?

राजाराम लोंढेकोल्हापूर : महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम असतो. पडेल तिथेच पडेल, त्यात सातत्य नसायचे. त्यामुळे आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरिपाची काढणी होऊन रब्बीच्या पेरण्या सुरू होतात; पण यंंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नाही.

आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे; पण एकसारखा पाऊस तोही ढगफुटी झाल्याने खरीप काढणीचे धाडस होत नाही. जोरदार पावसाने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पिकांवर पाणी उभा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.महापूर व अतिवृष्टीने पिके गेली. त्यातून राहिलेली पिके परतीच्या पावसाने गेली. महापुरात बाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली; पण अद्याप याद्यांचा घोळच सुरू आहे. महापूर ओसरून तीन महिने झाले तरी कर्जमाफी याद्यांतच अडकल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे.

ऊसपीक महापुरात गेले, भात, सोयाबीन परतीच्या पावसाने घालविल्याने आता जगायचं कसं? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उरली-सुरली पिके काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

काढणीपूर्वी पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित होते; पण कृषी व महसूल विभागाची यंत्रणा अद्याप थंडच आहे. कुजलेली पिके काढायची की पंचनाम्याची वाट पाहत तशीच ठेवायची? मायबाप सरकार आमच्या बांधावर येणार तरी कधी? या विवंचनेत शेतकरी आहे.अस्मानी संकट पहिल्यांदाचशेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे नवीन नाहीत; पण महापूर, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस अशी एकामागून एक अस्मानी संकटे पहिल्यांदाच आली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे; पण सरकारी यंत्रणेची गती पाहता तातडीने मदत मिळणे कठीण वाटते.

शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सरकारी यंत्रणा सुस्तच आहे. पंचनामा होत नसल्याने पिके काढायची की नाही? हेच कळत नाही. राज्यकर्त्यांनी बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.- माणिक शिंदे ,शेतकरी, शिये

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर