शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत जाते तेव्हा...!

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

‘‘लोकमत’ इफेक्ट : वीज कंपनीची यंत्रणा हादरली, शनिवारी सुटी असूनही अधिकारी कार्यालयात; वीज कनेक्शन आठ दिवसांत जोडणार

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये आलेल्या एखाद्या बातमीची दखल किती तत्परतेने घेतली जाते, याचाच अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकरी सदाशिव दिनकर निकम यांना शनिवारी आला. पैसे भरूनही त्यांना तब्बल २२ वर्षे कनेक्शन मिळाले नसल्याचे वृत्त शनिवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ‘महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत त्यांच्या गावी गेली. त्यांना मेढा येथे आणून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतली व आठ दिवसांत कनेक्शन जोडण्याची ग्वाही बारामती झोनचे मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी दिली. इतकी वर्षे रखडलेले काम इतक्या जलदगतीने होणार म्हटल्यावर निकम यांना भरून आले. सदाशिव निकम हे करंदी गावचे अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी पहिल्यांदा १९९३ ला वीज कनेक्शनसाठी १९१० रुपये भरले. तो अर्ज निकाली निघाला म्हणून नव्याने पैसे भरा म्हणून सांगितल्यावर त्यांनी पुन्हा १२ आॅक्टोबर २०११ रोजी ३०२५ रुपये भरले. पहिल्या अर्जाची अनामत रक्कम त्यांना आजही मिळालेली नाही. दोन अर्ज करून त्यासाठी अनामत भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नव्हते. अनेक वेळा हेलपाटे मारूनही महावितरणचे अधिकारी ‘आता तुमचाच नंबर बघा,’ असे आश्वासन देत; परंतु प्रत्यक्षात कनेक्शन काही जोडत नव्हते. त्यासंबंधीची व्यथा निकम यांनी ‘लोकमत’कडे मांडली. शनिवारी त्याचे वृत्त प्रकाशित होताच वीज कंपनीची यंत्रणा हादरली. दुसऱ्या शनिवारची सुटी असूनही मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे व कनिष्ठ अभियंता सी. आर. महाडिक कार्यालयात आले. गावातील वायरमनद्वारे निकम यांना भेटायला या, असा निरोप दिला. त्यांच्याकडे वाहनाची सोय नव्हती म्हटल्यावर वायरमनला ‘वाहन करून त्यांना घेऊन या,’ असे सांगण्यात आले. त्यानुसार वायरमन त्यांना घेऊन मेढा येथे गेला. तिथे त्यांच्याकडून पूर्वीच्या वायरमनने एक हजार रुपयांची लाच घेतल्याचे लेखी लिहून घेतले व ट्रान्सफॉर्मर बसवून तातडीने कनेक्शन देण्याची ग्वाही देण्यात आली. मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले,‘निकम यांची व्यथा मी वाचल्यावर सकाळीच मेढ्याचे उपअभियंता थोरवडे यांना तातडीने कनेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. निकम यांना कनेक्शन मंजूर आहे; परंतु त्यांचे क्षेत्र गावठाणजवळ आहे. शेतीपंपाचे कनेक्शन असल्याने दुसऱ्या फीडरवरून ते द्यायला हवे होते. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवायला लागत होता. तो बसविण्यासाठी नेमलेल्या सांगलीच्या पाटील एजन्सीने हे काम वेळेत न केल्याने कनेक्शन देण्यास विलंब झाला; परंतु आता मागे काय झाले याची कारणे न सांगता पहिल्यांदा त्यांचे कनेक्शन जोडावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार शक्य तितक्या लवकर कनेक्शन जोडले जाईल.’