शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकार कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू

By admin | Updated: May 23, 2016 00:58 IST

चंद्रकांतदादांची ग्वाही : अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष समितीचे पहिले महाअधिवेशन

कोल्हापूर : सुवर्णकार समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची गरज नाही, समाजाच्या उन्नत्तीसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी सुवर्णकार समाज महाअधिवेशनात दिले.अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृति समितीच्यावतीने येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सुवर्णकार समाजाचे पहिले महाअधिवेशन झाले. या अधिवेशनाचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद््घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, सुरेश हळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर तसेच जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक हे प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला काय हवे आहे हे जाणले, त्याचप्रमाणे भाजप-शिवसेना युतीचे सरकारने एलबीटी, टोल, शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी यासाठी जनतेला आंदोलने करू न देता प्रश्न निकाली काढले. सुवर्णकार कामगार कल्याण मंडळाची स्थापन करणे, नोकरीत आरक्षण आणि नरहरी महाराजांचे पंढरपूर येथील स्मारकाचे काम या तीन मागण्यांवर सर्वंकष माहितीपूर्ण अहवाल द्यावा. त्यावर समाजकल्याण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बैठकीचे आयोजन करून त्याची पूर्तता करू,असेही आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सुवर्णकार समाज हा असंघटित व अल्पसंख्याक समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी राज्याच्या समाजकल्याण मंत्र्यांसोबत येत्या १५ दिवसांत पूर्ण अहवाल घेऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार राजेश क्षीरसागर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही समाजास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी म्हणाले, ‘अच्छे दिन’ येण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे सांगत समाजाच्या १३ मागण्या ठेवल्या. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनीही मार्गदर्शन केले. यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, उपाध्यक्ष नंदकुमार वेदपाठक, शीतल पोतदार,अविनाश मुखरे,अजित पोतदार, राजू पोतदार, राजेंद्र पोतदार, नीलेश पोतदार, किशोर पोतदार, अरुण माणकापुरे, आदींसह महाराष्ट्राबरोबर गोवा आणि कर्नाटक येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यपाल, शरद पवार यांच्याही शुभेच्छाअखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्यावतीने आयोजित अधिवेशनाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिखित स्वरूपात शुभेच्छा दिल्या.खा. प्रकाश हुक्किरे यांची ३७ लाखांची मदतसमाजाच्यावतीने चिकोडी येथे समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिरासाठी ३७ लाख रुपये मदत तेथील खासदार प्रकाश हुक्किरे यांनी यांनी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाम फौंडेशनला मदतदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने नाम फौंडेशनला मदत करण्यात येणार आहे. ती मदत गोळा करण्याचे औपचारिक उद्घाटनही यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, प्रसाद धर्माधिकारी आणि समाजाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले. अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्यावतीने कोल्हापुरात रविवारी सुवर्णकार समाज महाअधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उदय पोतदार, राजेंद्र पोतदार, प्रसाद धर्माधिकारी, सुनील वेदपाठक, बन्सीलाल बकरे आदी उपस्थित होते.