शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: September 7, 2015 22:41 IST

कलबुर्गी हत्या प्रकरण : मेघा पानसरे यांनी घेतली कलबुर्गी कुटुंबीयांची भेट, तिन्ही कुटुंबीयांमार्फत विचारणा करणार

कोल्हापूर : कन्नडमधील ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा न लागल्यास १३ सप्टेंबरनंतर कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे याचे कुटुंबीय एकत्रिपणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तपासाबाबत विचारणा करणार आहेत. रविवारी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी धारवाडला जाऊन कलबुर्गी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.रविवारी (दि. ६) मेघा व कबीर पानसरे कलबुर्गी कुटुंबीयांना भेटण्यासाठी धारवाड येथे गेले होते. तिथे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी (चेन्नई), ज्येष्ठ कन्नड कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेमा पट्टणशेट्टी, कर्नाटक स्त्री साहित्यिक संघाच्या अध्यक्ष डॉ . वसुंधरा भुपती, प्रा. शशीधर तोडकर, शंकर हलगत्ती असे सर्व डॉ. कलबुर्गी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी उमादेवी, मुलगा श्रीविजय व इतरांची भेट घेऊन सांत्वन केले. खुनाची घटना व त्याचे तपशील समजून घेतले. याप्रसंगी मेघा यांनी आपले अनुभव सांगितले. कलबुर्गी कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. डॉ. कलबुर्गी यांची ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेले साहित्य अकादमीसह इतर असंख्य पुरस्कार त्यांच्या विपुल कार्याची जाणीव करून देत होते. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकाच प्रवृत्तीचे लोक आहेत असे समोर आले. धर्मचिकित्सा हा तिघांच्याही प्रबोधनकार्याचा गाभा होता. त्याला अनेकांचा विरोध होता. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांच्या तपासाबद्दल सखोल चर्चा झाली. चर्चेअंती असे ठरले की एक आठवडा तपासात काय निष्पन्न होते ते पाहायचे. जर काहीच धागेदोरे हाती लागले नसतील, तर १३ सप्टेंबरनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन तिन्ही कुटुंबीय खुन्यांना त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी करतील. विशेष तपास पथक स्थापून त्याना केवळ याच घटनेचा तपास करण्याची जबाबदारी द्यावी, अशीही मागणी करण्याचे ठरले. (प्रतिनिधी) दबाव आणा---मेघा पानसरे, डॉ. वसुंधरा व डॉ. हेमा यांनी कन्नड साहित्यिक व विवेकवादी बुद्धिजीवी लोकांना आवाहन केले की त्यांनी अशा हत्यांचा निषेध करावा. शासनावर तपासासाठी दबाव आणावा.