शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

‘होसूर’चा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 27, 2014 23:01 IST

शिक्षकाने दिली विनामूल्य जमीन

संजय पाटील : कोवाड , विविध आंदोलनांच्या माध्यमातून गेली दोन वर्षे सतत गाजत असलेल्या होसूर (ता. चंदगड) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. केवळ गावच्या पाणीप्रश्नासाठी येथील शेतकरी बी. बी. नाईक यांनी विनामूल्य लाखमोलाची जमीन दिल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.कोवाड-बेळगाव मार्गावर कर्नाटक सीमारेषेनजीक होसूर गाव वसले आहे. १४०० लोकसंख्या असणाऱ्या या गावाला केवळ पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरील किटवाड, कर्नाटकातील बेकीनकेरे व शेतवडीतील खासगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून किटवाड लघुपाटबंधारे तलावातून ३३ लाखांची ‘जलस्वराज्य’ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेत प्रचंड दोष राहिल्याने ही योजनाच पूर्णपणे निकामी झाली. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावामध्ये नवीनच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्याचा निर्धार केला असून, तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. पहिल्या योजनेचा अनुभव लक्षात घेता ही योजना सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पूर्ण करणे गरजेचे आहे. मागील जलस्वराज्य योजनेतील त्रुटी दूर केल्यास व योजना पूर्णत्वासाठी प्रयत्न केल्यास होसूरकरांना निश्चितच स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकते.शिक्षकाने दिली विनामूल्य जमीनया योजनेमध्ये तलाव व गावातील अंतर व चढ विचारात घेता मध्यंतरी पाणी लिफ्ट करावे लागणार आहे. मात्र, जिथे लिफ्ट करावे लागणार तिथे जागेची अडचण होती. मात्र, गावातील प्रगतशील शेतकरी बी. बी. नाईक या शिक्षकाने गावच्या पाणीप्रश्नासाठी विनामूल्य गुंठाभर जमीन दिल्याने ही अडचणसुद्धा दूर झाली आहे.