शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जिल्हा परिषद कॉलनीत पाणी चोरी उघड, महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले

By भारत चव्हाण | Updated: December 19, 2023 16:52 IST

पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनी येथील अनेक घरात पिण्याच्या पाण्याची बेकायदेशीर कनेक्शन घेण्यात आल्याची माहिती  कळताच महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी मोहिम राबवून २५ हून अधिक घरातील बेकायदेशीर कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. या कारवाईत पाणी चोर सापडले असले तरी पाणी चोरांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले. फुलेवाडी रिंगरोडला लागून असलेली जिल्हा परिषद कॉलनी महापालिकेच्या हद्दीत नसून नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. तेथे काही ठेकेदारांनी कॉलनी वसविली आहे. कॉलनी वसविताना, घरे बांधून देताना घर मालकांना महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिनीवरुन तीन ते चार इंची  जलवाहिनी टाकून घरांना कनेक्शन दिली आहेत. महापालिका हद्दीत कॉलनी येत नसल्याने त्यांना कनेक्शन देण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली आहेत.

या बाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी सर्व कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने  मंगळवारी जिल्हा परिषद कॉलनीत जाऊन अनेक घरातील नळ कनेक्शनची तपासणी केली. तेंव्हा सर्व कनेक्शन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे २५ घरातील कनेक्शन बेकायदेशीर आढळून आल्यानंतर ती तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभर ही कारवाई सुरु होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी