Kolhapur: कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:31 IST2025-06-25T14:29:35+5:302025-06-25T14:31:08+5:30

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज, बुधवारी (दि.२५) दुपारी एक ...

Water level of Krishna river increases in kolhapur, first Dakshindwar ceremony held at Datta temple in Nrusinghwadi | Kolhapur: कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न 

Kolhapur: कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न 

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज, बुधवारी (दि.२५) दुपारी एक वाजता संपन्न झाला. दुपारची वेळ व ज्येष्ठ अमावस्या यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी एक वाजता चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. 

भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प. प. श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

दक्षिणद्वार सोहळा योगायोगच

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात. 

Web Title: Water level of Krishna river increases in kolhapur, first Dakshindwar ceremony held at Datta temple in Nrusinghwadi