Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:59 IST2022-07-05T14:53:28+5:302022-07-05T14:59:40+5:30
दुपारी २ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी २६ फूट ००" इंच इतकी झाली आहे. तर १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार
कोल्हापूर : दोन दिवसापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोकणातील दोन प्रमुख नद्यांनी तर इशारा पातळी गाठली आहे. यातच कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पूर परिस्थितीची खबरदारी घेता जिल्ह्यात आज, मंगळवार (दि.०५) रात्रीपर्यंत एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल होणार आहेत.
हवामान विभागाकडून पुढील चार दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी २६ फूट ००" इंच इतकी झाली आहे. तर १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.