शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्याची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोपार्डे : करवीर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. १ एप्रिलपासून नवीन १८५ रुग्णांची भर पडली आहे. उपनगर, ...

कोपार्डे : करवीर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. १ एप्रिलपासून नवीन १८५ रुग्णांची भर पडली आहे. उपनगर, शहरालगतची गावे ही हॉटस्पॉट बनत चालली असून ग्रामीण भागातही रुग्ण वाढल्याने कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे.

करवीर तालुका कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत आघाडीवर आहे.

शहरालगतचा तालुका असल्याने आणि तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये शहरात असल्याने नागरिकांना शहरात कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त दररोजचा हमखास संपर्क आहे. याचाही परिणाम कम्युनिटी स्प्रेडचा मोठा परिणाम कोरोना रुग्ण वाढीवर दिसत आहे.

उपनगर व शहरालगतच्या गावात जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याला फाटा दिला जातो याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याने दिवसेंदिवस इतर तालुक्यांच्या तुलनेत करवीर तालुक्यातील दररोजच्या रुग्ण वाढीचा दर दुप्पट वाढत चालला आहे

३० मार्चला तालुक्यात ८ रुग्ण सापडले होते. यानंतर गेल्या दहा दिवसांत १८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. दररोज किमान २० ते २५ रुग्ण तालुक्यात सापडत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेडचा धोका दिसू लागला असून आमशी, म्हारूळ या ग्रामीण भागात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. लसीकरणासाठी लस पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाचे मोठे आव्हान आहे.

कोट...

करवीर तालुक्यात कोविड लसीकरणाला वेग देण्याच काम सुरू आहे. तालुक्यात २९ ठिकाणी कोविड लसीकरण सुरू असून आजअखेर ४५ वर्षांवरील ३७ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. जवळपास ४५ वर्षांवरील पात्र लोकांपैकी ४० टक्के लोकांना लसीकरण झाले आहे.

प्रतिक्रिया

करवीर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. याचे लोण ग्रामीण भागात पसरण्याअगोदर जनतेने आपले घर आपली जबाबदारी घेतली पाहिजे. कोविड केंद्राची गरज असल्याने शिंगणापूर, केआयटी कॉलेज तसेच ग्रामीण भागात मागील वर्षी तयार केलेल्या केंद्रांची सतर्कता म्हणून तयारी ठेवणे आवश्यक आहे.

-राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती, करवीर पंचायत समिती