शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची रॅपिड ॲंटीजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 19:11 IST

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून महापालिकेतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये जे लोक जुजबी कारणांसाठी उगीचच बाहेर पडत आहेत, त्यांची चौकातच कोरोनाची रॅपिड ॲंटीजन चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी त्यासाठी मिरजकर तिकटी परिसरात अशी रांग लागली होती.

ठळक मुद्देकोल्हापुरात वाढती बेफिकिरीसंचार रस्त्यावर अन् बंदी कागदावर

कोल्हापूर : कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून महापालिकेतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये जे लोक जुजबी कारणांसाठी उगीचच बाहेर पडत आहेत, त्यांची चौकातच कोरोनाची रॅपिड ॲंटीजन चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी त्यासाठी मिरजकर तिकटी परिसरात अशी रांग लागली होती.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, तरी कोल्हापूरच्या जनतेत कोरोनाविषयी भीती नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरावर प्रचंड हलगर्जी दिसून येत आहे. सोमवारी कोल्हापुरात संचार रस्त्यावर आणि बंदी कागदावर अशी स्थिती दिसून आली.कोल्हापूर शहरात रविवारी बऱ्यापैकी वर्दळ कमी होती. परंतु सोमवारी पुन्हा चित्र वेगळे दिसले. सर्वच रस्त्यावर वाहनांची वर्दळ, नागरिकांचा खुलेपणाने होणारा संचार, दुकानांच्या दारात झालेली गर्दी, रिक्षा वाहतूक सुरू, फेरीवाल्यांची रेलचेल, अत्यावश्यक सेवेतील गर्दीत हरविल्याचे जाणवत होते. रस्त्यावरील सिग्नल बंद असले तरी चार चाकी वाहनांची ये-जा सुरूच होती. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अशा वाहनांचे पार्किग होते. अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या अस्थापना सुरू होत्या. नागरिकांचाही तिथे राबता होता.बिंदू चौक, दसरा चौक आणि रंकाळा टॉवर येथेच काय तो बंदोबस्त पाहायला मिळाला. पोलीस रस्त्यावर नाहीत आणि कोणी अडवत नाहीत हा संदेश घरोघरी पोहोचल्यामुळे शहरातील संचार अगदीच मुक्त झाला. पार्सलच्या नावावर काही रेस्टॉरंट, हॉटेल आतील बाजूने सुरू होती. चहाच्या गाड्या, वडाभजी विक्री करणाऱ्या हातगाड्या सुरू होत्या. तेथील गर्दीही नजरेत भरत होती.रविवारी कपिलतीर्थ व लक्ष्मीपुरी भाजी मंडईत काही विक्रेते, भाजी खरेदीला आलेले नागरिक कोरोना बाधित आढळले असतानाही नागरिकांनी भाजी खरेदीला गर्दी केली होती. मोठ्या संख्येने भाजी मंडईत कोरोनाबाधित आढळल्यानंतर तेथील नागरिकांची गर्दी आपोआप कमी होईल, असे वाटत होते. मात्र चित्र यापेक्षा वेगळे होते. भाजी न्यायला लोक मंडईत गेलेच होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर