Kolhapur: उत्तुरच्या वृषाली कांबळे हीचे अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:05 PM2024-04-17T16:05:38+5:302024-04-17T16:05:48+5:30

उत्कर्षा पोतदार  उत्तूर : येथील वृषाली संतराम कांबळे हिने  युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या ...

Vrishali Kamble of Uttur cleared the UPSC exam at the age of 23 in her first attempt | Kolhapur: उत्तुरच्या वृषाली कांबळे हीचे अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश

Kolhapur: उत्तुरच्या वृषाली कांबळे हीचे अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश

उत्कर्षा पोतदार 

उत्तूर : येथील वृषाली संतराम कांबळे हिने  युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षीच पहिल्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. देशभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांमधून तीने ३१० वी रॅन्क पटकावली.

वृषालीचे मूळ गाव उत्तूर असून तीचे वडिल संतराम कांबळे कामानिमित्त नेरूर येथे रहातात. नेरुर येथील सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण ‌व फोर्ट येथील सेंट झिविअर्स कॉलेजमध्ये तिचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. तीने राज्यशास्त्र विषयातून बी.ए पूर्ण केले आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दिशा निश्चित..

वृषालीने इयत्ता आठवी पासूनच आपण आय.ए.एस. ची परीक्षा हे ध्येय निश्चित केले होते. त्यामुळे तिने माध्यमिक शिक्षण घेत असतानाच जनरल नॉलेजचा अभ्यास सुरू केला होता.

मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश नाही..

वृषालीला दहावीला व बारावीला 90 टक्के मार्क असूनही तिने इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतला नाही. तिने कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्रातून पदवी संपादन केली व आय.ए.एस.ची परीक्षा दिली.

Web Title: Vrishali Kamble of Uttur cleared the UPSC exam at the age of 23 in her first attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.