शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-बिरदेव यात्रेस थाटात प्रारंभ

By admin | Updated: November 1, 2015 00:57 IST

फरांडेबाबांची भाकणूक : पट्टणकोडोलीत लाखो भाविकांची उपस्थिती

पट्टणकोडोली : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात ‘श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात फरांडेबाबांनी ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकही झाली. फरांडेबाबा (खेलोबा वाघमोडे) ‘हेडाम’ खेळत मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. ‘श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत त्यांनी भाकणूक केली. ‘रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा धारण, मणाची धारण खळ्याकाठी पोतं दोन-अडीच, रोगाचा कमी-अधिक प्रमाणात, भक्तगण जो माझी सेवा करील त्यावर माझ्या कांबळ्याची छाया असेल, राज्यात गोंधळ होईल; पण नंतर शांतता नांदेल, अशी भाकणूक फरांडेबाबांनी केली. फरांडेबाबा मंदिरासमोरील दगडी गादीवर विराजमान झाले होते. सकाळपासून ढोलवादनाने परिसर दणाणून गेला. भंडारा, खारका, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. मंदिर परिसर सुवर्णमय झाल्यासारखा भासत होता. मुख्य धार्मिक विधीस दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. गावचावडीत गावकामगार पाटील प्रकाश पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे, शस्त्रांचे पूजन झाले. यावेळी मानकरी, गावडे, चौगुले, कुलकर्णी, समस्त पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ उपस्थित होते. भानस मंदिरात व श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मानकऱ्यांनी फरांडेबाबांना निमंत्रित केले. त्यांच्याबरोबर मानाचा घोडा, छत्र्या, ढोल, कैताळांचा लवाजमा होता. परंपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन निमंत्रित केले. यावेळी भंडाऱ्याची उधळण सुरू होती. फरांडेबाबा हातात तलवार घेऊन दुपारी अडीच वाजता उभे राहिले. यावेळी चांगभलं’चा अखंड गजर सुरू होता. ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक स्तब्ध झाले. मानाच्या छत्र्या फरांडेबाबा यांच्यावर फिरविण्यात आल्या. त्यानंतर पोटावर मानाच्या तलवारीचे वार करीत फरांडेबाबा हेडाम खेळत प्रदक्षिणा घालून मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. भाकणूक झाल्यानंतर फरांडेबाबा दर्शन घेऊन मंदिरामागील दगडी गादीवर विराजमान झाले. भाकणूक सोहळ्यादरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, कागल मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांचा प्रचंड ताफा या भागात होता. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या, तर तात्पुरते बसस्थानकही उभारले होते. महावितरण कंपनीने अखंडित वीजपुरवठा केला होता. मंदिर परिसरात भंडारा, खारका, नारळ, भांडी, खेळणी, मेवामिठाई, घोंगडे यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. जागोजागी बाहेरगावच्या भाविकांनी धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सादर झाले. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे व हुपरी पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)