विश्वास पाटील, डोंगळेंनी घेतली नरकेची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST2021-04-19T04:22:47+5:302021-04-19T04:22:47+5:30

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी रविवारी अरुण नरके यांची भेट घेतली. ...

Vishwas Patil, Dongle visited hell | विश्वास पाटील, डोंगळेंनी घेतली नरकेची भेट

विश्वास पाटील, डोंगळेंनी घेतली नरकेची भेट

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी रविवारी अरुण नरके यांची भेट घेतली. ‘गोकूळ’च्या सभागृहात पाटील, डोंगळे व नरके हे ३५ वर्षे एकत्र होते, मात्र नरके यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

अरूण नरके यांनी ‘गोकूळ’ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ते गेली ४६ वर्षे ‘गोकूळ’मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. याबद्दल चार दिवसापुर्वी ‘गोकूळ’ मध्ये नरके यांचा सत्कार करण्यात आला. मात्र या सत्काराला विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील यांना बोलावले होते. त्यामुळे त्यांनी नरके यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

अरुण नरके यांच्या सोबत ३५ वर्षे काम केले. परवाच्या सत्कार समारंभाबाबत आम्हाला माहिती नव्हते. त्यामुळे घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन आल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळी : ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी यावेळची निवडणूक लढवत नाहीत, त्याबद्दल विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील यांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. (फोटोे-१८०४२०२१-कोल-गोकूळ)

Web Title: Vishwas Patil, Dongle visited hell