विश्वविजय खानविलकर भाजपच्या वाटेवर

By Admin | Updated: September 14, 2014 00:35 IST2014-09-14T00:33:23+5:302014-09-14T00:35:22+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिवंगत नेते, राज्याचे माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे सुपुत्र विश्वविजय खानविलकर

Vishwajjay Khanvilkar on the way to BJP | विश्वविजय खानविलकर भाजपच्या वाटेवर

विश्वविजय खानविलकर भाजपच्या वाटेवर

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिवंगत नेते, राज्याचे माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे सुपुत्र विश्वविजय खानविलकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज, शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोल्हापुरात भेट घेतली आहे. येत्या चार-पाच दिवसांत खानविलकर पुढील निर्णय घेणार आहेत.
दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर त्यांचा गट पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. विश्वविजय खानविलकर यांनी काहीतरी निर्णय घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांचा गेले सहा महिने त्यांच्यावर दबाव होता.
विश्वविजय यांनी चार दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याशी मुंबई येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती. आज त्यांनी विमानतळावर गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरी यांच्या गाडीतून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत आले.

Web Title: Vishwajjay Khanvilkar on the way to BJP