विश्वजित शिंदेचा चंद्रकांत जाधवांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:43+5:302021-09-24T04:27:43+5:30

विश्वजित हा फुटबाॅल क्लब कोल्हापूर सिटी (एफसी) संघाचा खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय फुटबाॅल महासंघामार्फत व कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने ...

Vishwajit Shinde felicitated by Chandrakant Jadhav | विश्वजित शिंदेचा चंद्रकांत जाधवांकडून सत्कार

विश्वजित शिंदेचा चंद्रकांत जाधवांकडून सत्कार

विश्वजित हा फुटबाॅल क्लब कोल्हापूर सिटी (एफसी) संघाचा खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय फुटबाॅल महासंघामार्फत व कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून विश्वजितची १६ वर्षाखालील भारतीय युवा फुटबाॅल संघात निवड झाली होती. या संघातून त्याने चमकदार कामगिरी केली. याच खेळीच्या जोरावर त्याची १९ वर्षांखालील युवा फुटबाॅल संघात निवड झाली. याबद्दल आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते त्याला पुष्पगुच्छ व फुटबाॅल किट देऊन सत्कार करण्यात आला. यानिमित्त आमदार जाधव यांनी ‘चमकदार कामगिरी करून कोल्हापूरचा नावलौकिक अजून वाढव,’ अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, अमित पवार, युवराज पाटील, सचिन पायमल, अनुप चौगुले, आदी उपस्थित होते.

फोटो : २३०९२०२१-कोल-विश्व शिंदे

आेळी : कोल्हापूरचा युवा फुटबाॅलपटू विश्वजित शिंदे यांचा भारतीय युवा फुटबाॅल संघात निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Vishwajit Shinde felicitated by Chandrakant Jadhav