नेसरी : चंदगड–गडहिंग्लज राज्य मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला. एक पदरी काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या पदरीचे काम रखडल्याने रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे.दरम्यान, सलग वळीव पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन अनेक वाहने घसरून अपघात झाले. काही प्रवाशांना एसटी बस थांबल्याने दीड-दोन किलोमीटर पायी जावे लागले. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी काल, मंगळवारी संबंधित कंपनीचे डंपर अडवून आंदोलन केले. सरपंच गिरीजादेवी शिंदे यांनी रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत काम पूर्ण होईपर्यंत गाड्या अडवण्याचा इशारा दिला. पोलिसांनी केले नाही सहकार्ययावेळी संबंधित कंपनीचे डंपर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस स्टेशनमध्ये लावत असताना यावर तोडगा व चर्चा न करता पोलिसांनी तुमचं तुम्ही बघा. हे पार्किंग नाही. दुसऱ्या ठिकाणी गाड्या लावा असा सल्ला दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. तसेच पत्रकार मधस्ती करण्यास पुढे आले असता तुम्ही गप्प बसा, तुम्हाला ओळखत नाही असे म्हणत आपली जबाबदारी ढकलून दिली.प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन दरम्यान रस्ते प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वरिष्ठांना बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र पोलिसांच्या या भूमिकेवरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
Web Summary : Nesari villagers protested against slow road construction, causing traffic issues and accidents. Police inaction during the protest angered residents. Authorities promised action.
Web Summary : नेसरी के ग्रामीणों ने धीमी सड़क निर्माण के खिलाफ विरोध प्रदर्शन किया, जिससे यातायात समस्याएँ और दुर्घटनाएँ हुईं। विरोध के दौरान पुलिस की निष्क्रियता से निवासी नाराज़ थे। अधिकारियों ने कार्रवाई का वादा किया।