शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

विजय कोंडके महामंडळातून बाहेर

By admin | Updated: August 5, 2014 00:12 IST

अविश्वास ठराव मंजूर : सांगावकर, नलवडे, पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांना पाठीशी घालत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिलेले विजय कोंडके यांच्याविरोधात कार्यकारिणी सदस्यांनी आज, सोमवारी अविश्वास ठराव मंजूर केला. तसेच उपाध्यक्ष आणि महामंडळाची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल केलेल्या तिघांचेही सभासदत्व रद्द करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. महामंडळाच्या पुनर्लेखापरीक्षणाचा अहवाल देण्यावरून ३० जुलैला झालेल्या भांडणानंतर छाया सांगावकर यांनी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी आज महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी उपाध्यक्ष अष्टेकर, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, कार्यवाह सुभाष भुरके, सदस्य सदानंद सूर्यवंशी, सतीश बीडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सव्वाबाराच्या दरम्यान, कोंडके महामंडळाच्या दारात आले. मात्र, जोपर्यंत तुम्ही सांगावकर, नलवडे आणि पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द करण्याचा शब्द देत नाही, तोपर्यंत तुम्हाला बैठकीस जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत सदस्यांनी त्यांना पाऊण तास घेराव घातला. अध्यक्षांनी शब्द दिल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत या तिघांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी ९ विरुद्ध १ असा ठराव करण्यात आला. सदस्यत्व रद्द करू नये, असे एकमेव मत अध्यक्षांचे होते. या तीन व्यक्तींमुळे महामंडळाच्या परंपरेला आणि सन्मानाला धक्का लागलेला असताना अध्यक्ष त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून कार्यकारिणीतील संचालकांनी अध्यक्षांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सायंकाळपर्यंत चाललेल्या या बैठकीच्या अखेरपर्यंत अध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने अखेर कार्यकारिणीने त्यांच्याविरोधात ८ विरुद्ध २ असा अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले.विनयभंगाची तक्रार दाखल केल्याप्रकरणात अध्यक्षांनी विरोधकांच्या बाजूने कल देत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल, असे दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. (प्रतिनिधी) नूतन अध्यक्षांची निवड २५ रोजीमहामंडळाचे अध्यक्षपद विजय कोंडके आणि विजय पाटकर यांना एक-एक वर्षासाठी विभागून देण्यात आले होते. त्यानुसार कोंडके यांची अध्यक्षपदाची मुदत २७ आॅगस्टला संपणार होती. परंतु, त्याआधीच त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने आता हे पद रिक्त झाले आहे. २५ आॅगस्टला महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत नूतन अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती कार्यवाह सुभाष भुरके यांनी दिली. नूतन अध्यक्षपदी आता विजय पाटकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.