शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने बेवारस स्थितीत

By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST

डॉक्टरांची पदे रिक्त : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड; शासकीय लसीकरण योजनांचा लाभ मिळेना

अतुल आंबी - इचलकरंजी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक दवाखाने धूळ खात बेवारसपणे पडून आहेत. परिणामी अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे, तर ज्या गावातील दवाखाने बंद आहेत, तेथील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून, शासनाकडून येणाऱ्या लसीकरणाच्या योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जिल्हा परिषद व राज्यस्तरीय असे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेकडे पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ ची ९५ मंजूर पदे असून, ४३ पदे भरली आहेत व ५२ पदे रिक्त आहेत. सहायक अधिकारी वर्ग- ३ ची १५ पैकी १० पदे भरली असून, ५ रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षक दोन पदे रिक्त आहेत. राज्यस्तरीय शासनाच्या पशुवैद्यकीय ३६ दवाखान्यांत एकूण ३६ अधिकारी, ३६ कर्मचारी पदे मंजूर असून, त्यातील चौदा पदे रिक्त आहेत. यामध्ये साजणी, माणगाव, चंदूर, कुंभोज, सावर्डे, पारगाव, दत्तवाड, दानोळी, यड्राव, हेरवाड, शिरढोण, जांभळी, आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे खासगी डॉक्टरांकडे तपासून घ्यावी लागतात. महागड्या औषधोपचारांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच शासकीय लसीकरण योजनांचा लाभही शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात.तसेच आता या आकडेवारीमध्ये वाढ झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, पशुवैद्यकीय दवाखाने आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी घटली आहे. दूध उत्पादनात सधन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारी दवाखान्यात आपल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. काही दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीत. काही ठिकाणी आठवड्यातून एक-दोन दिवस डॉक्टरांची उपस्थिती असते. त्यामुळे जनावरे दवाखान्यात आणून परत न्यावी लागतात. जनावरांची हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.जिल्ह्यातील आकडेवारी२००७ च्या पशुगणनेनुसार एकूण दोन लाख ५३ हजार ३४७ गायी, सहा लाख ४६ हजार २१७ म्हशी, एक लाख ९१ हजार ४५९ शेळ्या, एक लाख ६५ हजार ६६८ मेंढ्या, आठ लाख ६८ हजार ३१९ कोंबड्या, एक हजार ६९६ घोडे, १३६ गाढवे, चार हजार ५८६ डुकरे, असे २१ लाख ३१ हजार ४२८ जनावरे आहेत, तर पाळीव कुत्रे, ससे व अन्य जनावरांची नोंद नाही.