शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वेळुकर यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली

By admin | Updated: February 19, 2015 23:46 IST

भालचंद्र मुणगेकर : कुडाळ येथील सत्कार समारंभात व्यक्त केली खंत

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी असलेल्या डॉ. राजन वेळुकर यांची नियुक्ती ही निवड झाल्यापासूनच वादग्रस्त ठरली असल्याने वेळुकरांनी यापूर्वीच राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागेपर्यंत त्या पदावर थांबलेल्या डॉ. राजन वेळुकरांनी कुलगुरू पदाची प्रतिष्ठा निश्चितपणे कमी केली असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुडाळ येथील गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच कुलगुरू निवड करणाऱ्या कमिटीने यापुढे जबाबदारीने काम करावे, असा सल्लाही निवड समितीला दिला. वादग्रस्त ठरलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना राज्यपालांनी कुलगुरू पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, डॉ. राजन वेळुकरांची या पदी निवड होण्याअगोदर मे २००० ते २००४ या कालावधीत या विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो. मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माझी निवड देशाच्या योजना सदस्य आयोगावर केल्याने मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी गेल्यानंतर या पदावर डॉ. राजन वेळुकरांची निवड कुलगुरू पदावर केली. मात्र, त्यांच्या या निवडीनंतर दहा वर्षांच्या कालावधीत अनेक घटना मुंबई विद्यापीठात घडल्या. त्यातील जास्तीत जास्त घटना वादग्रस्त होत्या. त्यांची निवड झाल्यापासून डॉ. वेळुकर यांची या पदी निवड हीच वादग्रस्त ठरली होती, असा खुलासाही यावेळी खासदार मुणगेकर यांनी केला. (प्रतिनिधी)निवड समितीवर ताशेरेच : भालचंद्र मुणगेकरमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती कुलपतीने ज्याअर्थी रद्द केली, ते पाहता एका अर्थाने निवड समितीच्या कार्यपद्धतीवर कुलपतींनी ओढलेले ताशेरेच आहेत, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले. एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे अशी शिक्षण क्षेत्रातील व्यक्त ींची इच्छा असल्यास त्यात काही गैर नाही. परंतु विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची प्रतिष्ठा समाजातील स्थान लक्षात घेता आपण कुलगुरू व्हावे, इतकीच इच्छा कमी नाही, तर आपण या पदासाठी लायक आहोत का, याचा सुध्दा विचार प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होऊन करणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले.निवड समितीने जबाबदारीने वागावेडॉ. वेळुकरांच्या नियुक्तीवरून ज्या प्रकारची वादग्रस्त परिस्थिती उद्भवली, ती लक्षात घेता यापुढे फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर कुलगुरूंची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने यापुढे अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.