जोतिबा डोंगर येथील वराची आत्महत्या

By Admin | Updated: July 5, 2015 01:11 IST2015-07-05T01:11:46+5:302015-07-05T01:11:46+5:30

कुटुंबीयांना धक्का : लग्नास नकार दिल्याने नियोजित वधूवर केला होता चाकू हल्ला

Varachi suicide in Jyoti dongar | जोतिबा डोंगर येथील वराची आत्महत्या

जोतिबा डोंगर येथील वराची आत्महत्या

कोल्हापूर : लग्नास नकार दिल्याच्या रागातून यादवनगर येथील नियोजित वधूवर चाकूहल्ला करून विषप्राशन केलेल्या तरुणाचा शनिवारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. फिरोज ईलाही पठाण (वय २५, रा. जोतिबा डोंगर, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.
यादवनगर येथील १९ वर्षीय युवतीचा फिरोज पठाण याच्याशी दोन महिन्यांपूर्वी विवाह निश्चित झाला होता. त्यानुसार त्याचा साखरपुडाही करण्यात आला. नोव्हेंबरला लग्नाचा मुहूर्त होता. दरम्यान, गुरुवारी (दि. २) फिरोज युवतीच्या घरी गेला होता. यावेळी तरुणीने अचानक लग्नास नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी त्याने संबंधित युवतीच्या हातावर व दंडावर वार करून तो निघून गेला. त्यानंतर जखमी युवतीला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्याच रात्री फिरोजने घरी येऊन विष प्राशन केले. नातेवाइकांनी बेशुद्धावस्थेत त्याला शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. फिरोजचे जोतिबा डोंगर येथे स्वत:चे शीतपेयांचे दुकान आहे. त्याचे वडील जोतिबा मंदिरात सनईवादकाचे काम करतात. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Varachi suicide in Jyoti dongar